जळगांव : नाशिक मिरर वेबटीम
रेल्वे यात्री सुविधासाठी अतिरिक्त दोनआरक्षित विशेष गाड्या
रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची गर्दी कमी दोन गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. पुणे -जम्मू तावी- पुणे आणि मुंबई- फिरोजपुर -मुंबई या दरम्यान विशेष आरक्षित गाड्या चालवण्यात येणार आहे.
1) पुणे जम्मू तावी पुणे विशेष गाडी :
गाडी क्रमांक 01077 डाऊन पुणे जम्मू तवी विशेष गाडी ही दिनांक १ डिसेंबर पासून पुढील आदेशापर्यंत दररोज पुणे स्टेशन हुन १७.२० वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी जम्मूतवी स्टेशनला १०.०० वाजता पोहोचेल.डाउन दिशामध्ये थांबा – मनमाड-23.15 ते 23.20,चाळीसगाव-00.08/00.10,पाचोरा-00.38/00.40, जळगाव-01.20/01.22, भुसावळ-01.50/01.55, बुऱ्हाणपूर-02.48/02.50 खांडवा-04.10/04.15
२. गाडी क्रमांक 01078 अप जम्मूतवी पुणे विशेष गाडीही दिनांक 03.12.2020 पासून ते पुढील आदेशापर्यंत दररोज जम्मुतवी स्टेशन हुन 23.40 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पुणे स्टेशनला 15.55 वाजता पोहोचेल.
अप दिशामध्ये थांबा- खंडवा-04.47/04.50, बुऱ्हाणपूर-05.38/05.40, भुसावळ-06.40/06.45,
जळगाव-07.10/07.12,पाचोरा-07.43/07.45,चाळीसगाव-08.18/08.20, मनमाड-09.25/09.30
३.मुंबई फिरोजपुर मुंबई विशेष गाडी :
गाडी क्रमांक 02137 डाऊन मुंबई फिरोजपुर विशेष गाडी दिनांक 01.12.2020 पासून ते पुढील आदेशापर्यंत दररोज मुंबई स्टेशन होऊन 19.35 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी फिरोजपुर स्टेशनला 05.10 वाजता पोहोचेल.
डाउन दिशामध्ये थांबा – नाशिक रोड -23.00/23.05, मनमाड -00.12/00.15,चाळीसगाव-01.03/01.05, जळगाव-02.08/02.10, भुसावळ-02.45/02.50, बुऱ्हाणपूर-03.38/03.40, खांडवा-04.57/05.00.
गाडी क्रमांक 02138अप फिरोजपुर मुंबई विशेष गाडी ही दिनांक 03.12.2020 पासून पुढील आदेशापर्यंत दररोज फिरोजपुर स्टेशन हुन 21.45 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी 07.35 वाजता मुंबई स्टेशनला पोहोचेल
अप दिशामध्ये थांबा- खंडवा-21.37/21.40, बुऱ्हाणपूर-22.28/22.30, भुसावळ-23.30/23.35,जळगाव-00.00/00.02,
चाळीसगाव-01.03/01.05, मनमाड-02.00/02.05,नाशिकरोड-03.05/03.10
फक्त कंफर्म तिकीट असणार्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची व प्रवास करण्याची परवानगी असेल.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड १९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.आरक्षण : 02137, आणि 01077 विशेष गाड्यांचे बुकिंग दि. २५.११.२०२० पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
