नाशिक मिरर वेबटीम : गॅस गिझर चा स्फोट झाल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना सिडकोत घडली . या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्माक नोंद केली आहे. पोलिसांनी माहिती दिली की,परिसरातील दौलत नगर येथील रहिवाशी गौरव समाधान पाटील ( वय २७ ) हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास राहते घरातील बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना, बाथरूम मध्ये लावण्यात आलेल्या गॅस गिझरचा अचानक स्फोट झाला . यात पाटील हे गंभीर जखमी झाले .त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शांताराम शेळके करीत आहे .
