सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात १८  हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरू ; आज ९ जणांचा मृत्यू

नाशिक मिरर वेबटीम :

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ६४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १८ हजार ९७३  रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार २७४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३५८, चांदवड ४७८, सिन्नर ४५४, दिंडोरी ३०३, निफाड ७५०, देवळा ७५९, नांदगांव ६५६, येवला ३०८, त्र्यंबकेश्वर ६०, सुरगाणा ५०, पेठ ४०, कळवण २२८,  बागलाण ६१२, इगतपुरी २८०, मालेगांव ग्रामीण ४८० असे एकूण ५ हजार ८१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार ६२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३००  तर जिल्ह्याबाहेरील २३४ असे एकूण १८ हजार ९७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ५९ हजार ८९३ रुग्ण आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८५.८१ टक्के, नाशिक शहरात ८७.६० टक्के, मालेगाव मध्ये  ८०.८६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.३८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६.७१ इतके आहे.

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ९१२  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार १०८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८८  व जिल्हा बाहेरील ६६ अशा एकूण २ हजार २७४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

*लक्षणीय :*

◼️१ लाख ५९ हजार ८९३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ३८ हजार ६४६  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८  हजार ९७३  पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८६ .७१ टक्के

दिनांक:  26 मार्च 2021 नाशिक

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2158*

*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – *4099*

नाशिक मनपा-      2090
नाशिक ग्रामीण-     1706
मालेगाव मनपा-     0231
जिल्हा बाह्य-         0072

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2283*

*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -09*
नाशिक मनपा-       04
मालेगाव मनपा-      00
नाशिक ग्रामीण-      04
जिल्हा बाह्य-          01

*26/3/2021 @ BLOCKWISE*

*Total recovered :140804*
*Total death : 2283*
*Active case in the district: 20905*

*Nashik NMC: (active patients)*: *12309*

*Nashik Rural (active patients)*: *6908*
Nashik :408
Baglan:797
Chandwad :463
Deola: 904
Dindori:376
Igatpuri:319
Kalwan:241
Malegoan :563
Nadgaon:780
Niphad:899
Peth:41
Sinner:583
Surgana: 73
Trimbak:86
Yeola: 375

*Malegaon MMC (Active patients)*: *1451*

*Out of district (Active Patients) : 237*

*Total cumulative positive cases : 163992*

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

बातम्या

Don`t copy text!