नाशिक मिरर : सध्या झी टिव्हीवर सुरु असलेल्या “अग्ग बाई सुनबाई” या नावाजलेल्या मालिकेत काल दि.२० रोजी रात्री ८.३० वाजेला प्रसारणातील दृश्यामध्ये मालिकेतील महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते “अद्वैत दादरकर” यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजिवीकेचे साधन असलेल्या शिलाई मशीनला लाथ मारली असल्याचे चित्रीकरण मालिकेतील दृश्यात दिसत असल्यांने राज्यातील शिवणकर्मी व सर्वच शिंपी समाजाच्या तसेच आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे.मालिकेतील या प्रकारामुळे समस्त शिंपी बांधवांच्या दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे सर्वत्र सोशल मिडियावर निषेधाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोषी झी टीव्हीने व फिल्म सेंन्सार बोर्डाने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी व चित्रीत केलेला वादविवाद प्रसंग त्वरीत वगळून टाकण्यात यावा अन्यथा संतप्त झालेल्या समस्त शिंपी समाजाकडून जाहीर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

त्याची संपूर्ण जबाबदारी ही “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीची राहील.असा इशारा अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे अध्यक्ष अरुण नेवासकर,कार्याध्यक्ष भास्कर टोंपे,महासचिव ईश्वर धिरडे, उपाध्यक्ष धनंजय जवंजाळ,मुख्य समन्वयक अनंत जांगजोड,प्रसिध्दी प्रमुख महेश मांढरे, ज्ञानेश्वर टिबे, अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाध्यक्ष रविंद्र बागुल,केंद्रीय संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप यांच्या सह राज्य सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि कार्यकर्ते यांनी दिला आहे.
यासंदर्भात तातडीने कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे.असेही पत्रकात नमुद केले आहे.

बातम्या

Don`t copy text!