12वी निकाल 2021 महाराष्ट्र, 12th hsc result 2021 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मंगळवार 3 ऑगस्ट रोजी 4.00 pm वाजता ऑनलाईन घोषित केला जाईल.

शासन निर्णय क्र. परीक्षा ०६२१/प्र.क्र.५६/एसडी-२ दि.०२/०७/२०२१ मध्ये निश्चित केलेली मूल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाचे दि.०५/०७/२०२१ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०११ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता.

https://hscresult.11thadmission.org.in/

http://hscresult.mkcl.org/

https://msbshse.co.in/

http://mahresult.nic.in/

 

 

बातम्या

Don`t copy text!