जेलरोड: येथील सेवा प्राय: संस्थेच्यावतीने माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांची भेट घेण्यात आली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर कपिल झोटिंग, संस्थेचे संचालक श्री अजय गव्हाणे, संचालक डॉक्टर मयूर गांगुर्डे, श्री पंकज कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी संस्थेने घेतलेले विविध उपक्रम यांचा आढावा नामदार जयंत पाटील साहेबांनी घेतला. तसेच आदिवासी व ग्रामीण भागात करत असलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल सेवा प्राय: संस्थेचे अभिनंदन केले. यावेळी डॉक्टर कपिल झोटिंग यांनी संस्थेला निर्माण होत असलेल्या अडचणी नामदार जयंत पाटील साहेबांना सांगितल्या. त्यावर नामदार जयंत पाटील साहेबांनी संस्थेस लागणारी वैद्यकीय उपकरणे विशेष निधीतून उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला.

बातम्या

Don`t copy text!