पारा 17.5 अंशावर

निफाड: नाशिक मिरर वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याची द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे .गुरुवार दि २९ आँक्टोबर रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात पारा १७.५ अंशावर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या सप्ताहात तालुक्यात ढगाळ हवामान अन तुरळक पावसाने विशेषता द्राक्ष बागायतदारांना हैराण केले होते. मात्र सप्ताहाच्या प्रारंभापासुन थंडीची चाहुल लागली होती. बुधवार रोजी पारा १७ अंशावर तर गुरुवारी पारा १७.५ अंशावर स्थिरावला असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे योगेश पाटील यांनी दिली .निफाड तालुक्यातील नांदुरमधमेश्वर अभयारण्य परिसरात देश विदेशातील पक्ष्यांची मांदियाळी भरण्यास वातावरण अनुकुल झाले आहे.

बातम्या

Don`t copy text!