राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी निवड जाहीर केली

मुंबई : नाशिक मिरर वेबटीम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कला सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख पदी सुप्रसिद्ध सिने कोरिओग्राफर डायरेक्टर सचिन शिरसाट यांची राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी निवड जाहीर केली आहे.निवडी प्रसंगी नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे, मुंबई प्रदेश महासचिव सचिन नागरे ,युवा नेते प्रशांत कटारे ,बिपिन कटारे उपस्थित होते.संपूर्ण भारतात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जोमाने वाटचाल करीत असून दररोज असंख्य जुनेजाणते नेते अनुभवी कार्यकर्ते महिला युवक युती ज्येष्ठ नेते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सर्वच क्षेत्रातील दिग्गज कलावंत प्रवेश करीत आहेत.सचिन शिरसाट.हे उत्तम कोरिओग्राफर असून त्यांचा जनसंपर्क संपूर्ण महाराष्ट्रात व बाहेर देशात देखील आहे. त्यांच्या निवडीने समस्त कलाकारांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांना समस्त सिनेसृष्टीतून कलाकारांकडून शुभेच्छा देखील येत आहे.

बातम्या

Don`t copy text!