भारतीय वडार समाज संघर्ष पार्टी कार्यकारिणी बैठक संपन्न
सातपूर : भारतीय वडार समाज संघर्ष पार्टी च्या कार्यकारिणी ची बैठक जनसंपर्क कार्यालय जयप्रकाश नारायण नगर सातपूर येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष कोळप्पा धोत्रे हे उपस्थित होते. या बैठकीत नाशिक जिल्हा च्या कार्यकरणीची निवड करण्यात आली.यामध्ये नाशिक जिल्हाध्यक्ष पदी भगवान देवकर यांची तर नाशिक शहर अध्यक्षपदी रितेश चिखलीकर यांची निवड करण्यात आली.नाशिक शहर महिला अध्यक्षपदी उषा देवकर यांची निवड करण्यात आली.पंचवटी विभागपदी योगेश चिखलीकर,नविन सिडको विभागपदी अनिता तुरकमाने,सातपूर विभागपदी अंकिता विश्वकर्मा,म्हसरूळ विभागपदी मिलिंद चिखलीकर यांची नाशिक शहर विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सातपूर विभागातून संघटक म्हणून ओमप्रकाश विश्वकर्मा यांची निवड करण्यात आली. या बैठकीस सुहास ठाकुर, किरण भाग्यवंत,विनोद आखाडे,योगेश संत,वाल्मिक ठाकुर,सचिन मुसळे,उमेश जाधव,सचिन ललवाणी, राहुल भालेराव, आदीसह पक्षाचे पदधिकारी उपस्थित होते.
