वृक्ष लागवड करताना आपल्याला लक्षात आले की, देशी वृक्षांची लागवड केली पाहिजे. परंतु आपल्या बऱ्याच मंडळींना देशी वृक्ष लागवड म्हणजे, वड, पिंपळ, उंबर, निम या वृक्ष प्रजातींशिवाय आपल्या देशी व प्रदेशनिष्ठ वृक्ष प्रजातींची माहिती नाही. त्यामुळे बरेच वृक्ष प्रजाती दुर्लक्षित होऊन, संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यापुढे आपल्याला वृक्षरोपण करताना, रोपांच्या संख्येपेक्षा, वृक्ष प्रजातींची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
खरतर, मला आपल्यासमोर वृक्षांच्या प्रजातींची माहिती द्यायची आहे. त्यामुळे इतर ठिकाणी पण योग्य वृक्ष लागवड संदर्भात प्रबोधन व्हावे, हीच तळमळ आहे.
आपण `नाशिक देवराईʼ व `नाशिक वनराई’ येथे लागवड केलेल्या वृक्षांची नावे अशी…
बेल, हळदू, तिवस, कुकर, निम, चांदवा, जंगली अजाण, आवळा, भेरली माड, अटरुण, कर्णीकार, काळा कुडा, वारस, कुसुम, अर्जुन, कळम, मेडशींग, पळस, पांढरा पळस, पिवळा पळस, बिब्बा, हिरडा, भुजडा, फालसा, धामणी, रोहण, वारंग, सीता अशोक, रुद्राक्ष, कौशी, शिंदी, मुचकंद, शिसम, शिसव, अंबाडा, खिरणी, काळा शिरीष, शिरीष, अंबा, कांचन, आम्ली, तुतु, काटे सावर, वरुन, शिवण, करवत, ताम्हण, नोनी, बाभुळ, कंसार, रामकाठी बाभुळ, शमी, देव सावर, लोखंडी, सादडा, पेटार, लकुच,बिजा, पांगारा, बुच पांगारा, काटे पांगारा, बिसतेंदु, भोकर, उंबर, रोहितक, नानद्रृक, पारसवड, रेशीम धावडा, बेहडा, गणेर, परस पिंपळ, कहांडळ, नरक्या, हिंगण बेट, लांब पानाचा नानद्रृक, उंडी, अंजनी, खैर, कृष्णवड, अजाण, बुध्दनारळ, चंदन, बुच, सुरंगी, डीकामली, काष्टी बांबू, माणवेल बांबू, पिवळा बांबू, अंजन, निन्नई, पाडळ, गुलाबी पाडळ, चिंच, करंज, करमळ, पिवळा करमळ, कुंभा, कुचला, बोंडारा, नाना, अळव, आपटा, तिरफळ, दक्षिण मोह, मोह, तेंदु, हुंब, मोई, बकुळ, पुत्रंणजिवा, भोरमाळ, आसाणा, रीठा, टेबुर्णी, पांढरा पांगारा, भिरा, नेवर, लीची, सेमला कांचन, कुंकू, गेळा, महारुख, काटे कुंबळ, घणसर, खडशिंगी, धावडा, काजु, खिडक, बोत्ती, घोटबोर, मोखा, बोर, दही पळस, जंगली शेवगा, कसुळ, काटसागोन, अंबा पायर, पायर, खडक पायर, सलई, लोध, गुग्गुळ, पाचपानी गुग्गुळ, पारीजातक, जाभुळ, पारजांभुळ, जांभुटणी, वड, पिंपळ, भुत्या, किरमीरा, वावळ, पाचुंदा, गांध्या ऊबंर, कोकम, दांडोस, फण्शी, किंजळ, रतनगुंज, कवट, लहान पानाचा आसाणा, अंकोल, ताडगोळा, चारोळी, सप्तपर्णी, तांबडा कुडा, काकड, गोंदण, घोळ, हिवर, बारतोंडी, ठिपकेवाला पायर, शेवगा, सिताफळ, रामफळ, टोकफळ, मोठी चांबुळी, बहावा, बिमल, टेटु, टुन, सरडोळ, पापडील, रक्त चंदन, भेंडी, भोमा, बकाम निम, महाळुंग, कढीपत्ता, अंबा अशोक, हिंगण बेट, पिवळा करमळ, एमपी पापडा, उल्टाकमबळ असे अजून काही प्रकार मिळून एकूण 220 प्रकारचे वृक्ष आहेत.
या व्यतिरिक्त जंगलातल्या वेली, झुडपे व कंदमुळे यांचीही लागवड आपण `नाशिक देवराई’ व `नाशिक वनराई’ येथे केली आहे.
लेखक – शेखर गायकवाड,
आपलं पर्यावरण संस्था, नाशिक
मो. नं. 94222 67801
—

