Nashik Fire News : पंचवटी कारंजा येथील वाड्याला भीषण आग

नाशिक मिरर न्यूज:

पंचवटी कारंजा (Panchavati Karanja) येथील प्रसिद्ध माधवजिका चिवडा दुकानाच्यावर असलेल्या डॉ. जोशी यांच्या वाड्याला (Wada) सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत (Fire) कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाड्यातील घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत.आग लागल्याची माहिती मिळताच भाजपा (BJP) पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी यांनी तत्काळ अग्निशामक दलाला संपर्क साधला. घटनास्थळी तातडीने दोन बंब दाखल झाले आणि जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर (Fire News) नियंत्रण मिळवले.

बातम्या

Don`t copy text!