नाशिक मिरर : कोजागिरी पौर्णिमानिमित्त प्रभाग क्रमांक ९ मध्ये दि.१९ ऑक्टोबर रोजी सप्तश्रृंगी देवी मंदिर,ध्रुवनगर येथे
देवीची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवीची महाआरती शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा गटनेते विलास शिंदे, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक करण गायकर,नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका हेमलता कांडेकर,माजी नगरसेवक सदाशिव माळी,सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, वैभव ठाकरे, साहेबराव जाधव,बाळा जारे,सम्राट सिंग,अविनाश गायकर,सचिन निकम,शिवसेना प्रभाग ९ शाखाप्रमुख संतोष पवार, प्रवीण इंगवले, सोनू काळे, सुमित बच्छाव,मनीषा गांगुर्डे मंगल खोटरे,आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्यां सविता करण गायकर,प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सप्तश्रृंगी मित्र मंडळ,ध्रुवनगर शिवाजीनगर यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की गेल्या साडे चार वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेना पक्षाचे काम खूप चांगले झालेले आहे.कोरोना काळामध्ये सात हजार कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप, दहा हजार कुटुंबियांना रोगप्रतिकारक आर्सेनिक गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर,हिंदूह्रदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभागातील महिलांना वस्त्रदान,ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार दरवर्षी साजरा केला जातो. तसेच सर्व थोर महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहा मध्ये साजरा केल्या जातात शिवसेनेच्या वतीने जे काही कार्यक्रम दिले जातात ते सर्व कार्यक्रम या प्रभागात राबविले जातात. त्याबद्दल यावेळी उपस्थित शिवसैनिकांचे भाऊसाहेब चौधरी यांनी अभिनंदन केले. तसेच प्रभागातील अनेक समस्या वेळोवेळी आंदोलन करून शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचे काम या प्रभागातील शिवसैनिकांनी केलेले आहे. या प्रभागातील अनेक समस्यांचे निराकरण करून या ठिकाणच्या लोकांना न्याय देण्याचे कामही शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आलेले आहे. त्यामुळे येणारा काळ हा शिवसैनिकांसाठी खूप चांगला आहे. या भागात निश्चितपणे शिवसेनेचा भगवा ध्वज फडकविल्या शिवाय या ठिकाणचे शिवसैनिक शांत बसणार नाही. या ठिकाणची परिस्थिती येणाऱ्या काळात बदलायचे असेल तर शिवसेना उमेदवारांना आपण येणाऱ्या काळात विजयी कराल असा विश्वास चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला. या भागातील नागरिक लोकशाहीला मानणारे आहेत सुज्ञ असे नागरिक परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत. या वेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना गटनेते विलास शिंदे, यांनीही मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर आणि प्रमोद जाधव यांनी आभार मानताना सांगितले की कुठल्याही परिस्थितीत या भागात शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवणार म्हणजे फडकवणार असा शब्द आलेल्या मान्यवरांना त्यांनी दिला.
