नाशिक मिरर वृत्तसेवा :

नाशिकच्या सातपूर MIDC परिसरातील सरकारी कार्यालयात स्वतःला अँटी करप्शन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत प्रवेश करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित सचिन महादू ठोके व त्याचा साथीदार रवींद्र द्विवेदी यांनी संगनमताने MIDC कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी एका वाहनावर “Anti Corruption” अशी पाटी लावून स्वतःची ओळख अँटी करप्शन विभागाचे पदाधिकारी म्हणून करून दिली.

या बनावट ओळखीच्या आधारे त्यांनी सरकारी कार्यालयात वावर करत कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. तसेच नागरिकांची दिशाभूल झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सचिन ठोके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री आंबेकर करत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे.

Don`t copy text!