नाशिक मिरर  :

सातपुर औद्योगिक वसाहतीतील मदर इंडस्ट्री असलेल्या बॉश कंपनीतील ७३० कंत्राटी कामगारांना गुरुवारी दि . २१ रोजी सकाळी पहिल्या शिफ्टपासून अचानक कामावरून कमी केले . बॉश कंपनीत ७३० ( एनईटीडब्ल्यू ) कामगार १० वर्षापासून काम करतात . या कामगारांना कामावर कायम करावे , यासाठी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली आहे . कोर्टाने स्थगिती आदेश दिला असतानाही व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या दंडेलशाहीकरून , कुठलेही कारण न देता , कुठलीही नोटीस , पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलेले आहे .

या कामगारांना उदरनिर्वाहासाठी इतर कुठलेही साधन नसून त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे . आज या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे . सदर सर्व कर्मचारी हे स्थानिक तरुण असुन ऐन दिवाळीच्या तोंडावर इतर कंपनीमध्ये बोनस वाटप सुरु असतांना बॉश कंपनीने या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करुन त्यांच्यावर अन्यायच केलेला आहे, त्या कामगारांना, त्वरित कामावर घेण्याबाबत कामगार आयुक्त यांची भेट घेऊन या कामगारांना ७ दिवसात कामावर रुजू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार सीमा हिरे यांनी दिला. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, विक्रम नागरे,अमोल इघे, राहुल गणोरें, रश्मी हिरे,चारुदत्त अहिरे उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!