नाशिक मिरर : 

पेट्रोल- डीझेलची सातत्याने होत असलेल्या दरवाढ रोखण्यात यावी, अशी मागणी करत आज सातपूर विभागाच्या वतीने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात व सातपूर येथे महविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत अनोख्या पद्धतीने पेट्रोल डीझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. सातपूर मधील जनता महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांना सातपूर गावापासून महाविद्यालयात बैलगाडी सोडून निषेध करण्यात आला.

यावेळी डॉ अमोल वाजे, सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते, पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितीन निगळ, विभाग अध्यक्ष निलेश भंदुरे, विशाल डोके, रामदास मेदगे, समाधान तिवडे, राहुल कमानकर, नवराज रामराजे, निलेश सानप, राहुल पाठक, डॉ.संदीप चव्हाण, विशाल पगार, महेश शेळके, रेहान शेख, अक्षय पाटील, सिद्धांत काळे, दादा निगळ, शिवाजी मटाले, राजाराम पाटील निगळ, शुभम गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य नागरिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!