नाशिक मिरर : महापालिकेच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिटीलींक बस सेवेला केंद्र सरकारकडून नुकताच एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी एका गृह प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी सातपूरला आलेल्या पंकजा मुंडे, जयकुमार रावल यांच्यासह नाशिक व धुळ्याच्या महापौर प्रदीप कर्पे यांनी सातपूर कॉलनी ते अशोकनगर असा अर्धा किलोमीटर पर्यंतचा बस प्रवास केला.

सातपूर कॉलनी येथील बोलकर मॅजेस्टिक या पंतप्रधानांच्या स्वप्नातील घरकुल प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंकजा मुंडे व जयकुमार रावल सातपूरला आले होते. यावेळी मुंडे यांनी बस वाहकाला १०० रुपयांची नोट घेऊन दहा रुपयांचे तिकीट घेतले होते. तसेच मागे बसलेल्या अन्य दोन नेत्यांनीही तिकिटे काढली होती.सातपूर कॉलनी ते अशोकनगर असा अर्धा किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या की महापालिकेचा बसमधून प्रवास करताना आपण तिकीट देखील काढले. पर्यावरणाच्या दृष्टीने अशी सेवा देशभरात सगळीकडे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या सेवेमुळे वाहतुकीवर देखील चांगला परिणाम होतानाच लोकांना सुंदर सुविधा दिल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास महापौर सतीश कुलकर्णी, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, नगरसेवक दिनकर पाटील, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका माधुरी बोलकर, वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, इंदुबाई नागरे, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वप्नातील कमी किंमतीतील घरे देण्यात येणार असल्याचे प्रकल्पाचे संचालक गणेश बोलकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.

मुलीला मान देणाऱ्यांच्या घरी लक्ष्मी : –
बोलकर मॅजेस्टिक या ग्रुह प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी गणेश बोलकर व नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या छोटी मुलगी स्वामींनी हिने उपस्थितांचे स्वागत केले. हा मुद्दा पकडून आपल्या मनोगतात पंकजा मुंडे म्हणाल्या की बोलकर कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीला मान दिला. अर्थातच जे लोक मुलींना मान देतात त्यांच्या घरी लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. मी हॉस्पिटल वगळता कधीही उद्घाटनाचा कार्यक्रम घेत नाही. मात्र आज सर्वांसाठी घर या योजनेतून बोलकर यांनी हा प्रकल्प उभारल्याने मी खास आले आहे. या गृह प्रकल्पाच्या माध्यमातून सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग चा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 सर्व सामान्य माणसाचा प्रकल्प : – 
२१ वर्षापूर्वी नोकरीसाठी आलेल्या सर्वसामान्य माणसाने प्रामाणिकपणे काम करून अनेक गृहप्रकल्प उभे केले. अशा माणसाच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी दिवाळी असतानाही आम्ही आलो असल्याचे नाशिकचे भाजपचे प्रभारी जयकुमार रावल यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

 

बातम्या

Don`t copy text!