नाशिक मिरर विशेष :
खरं तर महाराष्ट्र म्हटलं की क्रांती हा शब्द महाराष्ट्रापासून वेगळा होऊच शकत नाही. महाराष्ट्रात अनेक क्रांती घडून आल्या. क्रांतीतुनच आपला महाराष्ट्र निर्माण झाला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र हे क्रांतीकारकांचे राष्ट्र आहे असे म्हटले जाते. मागील ७० वर्षाचा विचार केल्यास महाराष्ट्रात ज्या चळवळी व क्रांती झाल्यात त्या केवळ देश स्वतंत्र व होऊन देशात लोकशाही, बंधुता,समता ,हक्क,न्याय प्रस्तापित होण्यासाठीच अनेक क्रांतिकारक यांनी आपले बलिदान दिले. देश स्वतंत्र झाला, महराष्ट्र राज्याला देखील राज्याचा दर्जा मिळाला. परंतु आज ही शेतकरी, विद्यार्थी,कामगार, विविध समाज घटक, युवक,महिला यांचे अनेक मुलभूत प्रश्न आ -वासून या देशासमोर उभे आहेत. या घटकावर होणारा अन्यायाचा वाचा फोडून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या समाजात अशा काही व्यक्ती व संघटना आहेत त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. १ जानेवारी रोजी छावा क्रांतिवीर सेना या चळवळ, आंदोलन या क्रांतीतून उभा राहिलेल्या संघटनेला सात वर्ष पूर्ण होऊन आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त जाणून घेवू , या संघटनेची व करण गायकर यांची वाटचाल ……
श्री . करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना , संस्थापक अध्यक्ष 
करण यांचे बालपण व कार्याची सुरुवात :
करण यांचा जन्म १ जानेवारी १९८८ रोजी नाशिक तालुक्यातील गंगाव्हरे या खेडे गावात झाला. करण यांचे टोपणनाव बाजीराव आहे. करण यांना अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याची शिकवण कुटुंबातून व शाळेमधून मिळाली. हीच शिकवण पुढे अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नेतृत्वाने करण यांच्यास मनावरती वारंवार बिंबवली गेली. पुढे शिव-शंभुंचा आदर्श घेऊन सामाजिक क्षेत्रात उतरले. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेतुन (अ. भा. छावा) पहिल्यांदा शाखाप्रमुख म्हणुन काम केले. यानंतर तालुका अध्यक्ष म्हणून व नंतरच्या काळात जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य केले. जिल्हा अध्यक्ष असताना अनेक समस्यांना वाचा फोडली. मराठा आरक्षणासाठी जिल्हाभर मेळावे घेतले, आंदोलने केले. शेतकरी कर्जमाफीसह शेतकर्यांच्या समस्यांसाठी कित्येकदा रस्त्यावर उतरलो. अनेक कामगारांचे प्रश्न सोडवले. आणि खऱ्या अर्थाने मराठ्यांचं तसेच शेतकऱ्यांचं प्रश्न सोडवन्यासाठी पुढे आले. येथूनच करण यांच्या कार्याला सुरूवात झाली. जिल्हा अध्यक्ष असतानाच पुढील काळात शेतकरी व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार,सोनिया गांधी,रावसाहेब दानवे यांसह अनेक राजकीय नेत्यांच्या सभा उधळुन ती आंदोलने यशस्वी केली.
केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीतून यशस्वी लढा :-
भाऊसाहेब चव्हाण व त्याच्या सहकार्यांनी केबीसीच्या माध्यमातून अनेक केबीसी गुंतवणूक दारांची फसवणुक केली होती. सर्व गुंतवणूकदार हतबल, निराश झाले होते. अशावेळी या गुंतवणूकदारांच्या न्याय हक्कासाठी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीची स्थापना करत गुंतवणूकदारांना दिलासा दिला. राज्यभरातील नाशिक , परभणी , हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर, नांदेड, नागपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मेळावे मोर्चे काढून अनेक आंदोलनांतुन हा लढा यशस्वीतेकडे नेत अखेर भाऊसाहेब चव्हाणला मुंबई पोलिसांनी अटक केली. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत याची सुटका झाली नाही. महाराष्ट्र भर विविध जिल्ह्यामध्ये केलेल्या आंदोलनांमुळे करण यांची ओळख अवघ्या महराष्ट्रात झाली आहे. करण गायकर यांचे गुरु राष्ट्रसंत भय्युजी महाराज व छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनामुळे कोणतेही आंदोलन हे शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची व यशस्वी करून अन्याय ग्रस्ताना न्याय मिळवून देण्याची ताकद व उर्जा मिळाली.
धडक कामगार युनियनच्या माध्यमातून हजारो कामगारांचे प्रश्न सोडवले. :
धडक कामगार युनियनच्या माध्यमातून करण व अभिजीत राणे यांच्या सोबत कामगारांचे राज्यभर जाळे उभे केले. व कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली. नाशिक, ईगतपुरी, संभाजीनगर, पुणे, जालना, नांदेड, अहमदनगर इ. जिल्ह्यांमधील हजारो कामगारांना नोकऱ्या मिळवुन दिल्या व कामगारांचे प्रश्न सोडवले. अनेक ठिकाणी धडक कामगार युनियनच्या शाखांची सुरुवात केली आहे.
अखेर छावा क्रांतीवीर सेनेची स्थापना केली :
दि १ जानेवारी २०१४ रोजी स्थापना करण गायकर यांनी स्वताची छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना केली .छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना करून ६ वर्ष पूर्ण होत आहे. केवळ सहा वर्षाच्या काळात अनेक पदाधिकारी, आंदोलने, शेकडो मेळावे, हजारो शाखा, लाखो सदस्य, अनेक छोटी-मोठी कार्य, राज्यात सर्वोत्कृष्ठ अधिवेशने आणि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान घोडदौड सुरू असलेली संघटना म्हणजे छावा क्रांतिवीर सेना अशी ओळख राज्य भर झाली आहे.संघटना महाराष्ट्र भर कार्यरत असून नाशिकसह,पुणे,संभाजीनगर,ठाणे, नवी मुंबई, अहमदनगर, जालना,बीड, परभणी,नांदेड़,बुलढाना, उस्मानाबाद यवतमाळ,चंद्रपुर,अमरावती, जळगाव, धुळे, सांगली,सातारा, सोलापुर,कोल्हापुर, पालघर ,लातूर ,रायगड ,रत्नागिरी, अकोला, वाशिम, नागपूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संघटनेची बांधनी मोठ्या प्रमाणात सुरु असून हजारो शाखा, लाखोंच्या संख्येने सभासद असलेली ही संघटना झाली आहे. राज्यातील कमीत कमी कालावधी मध्ये झपाट्याने वाढलेली ही एकमेव संघटना आहे.संघटनेला राजकारणा पासून कोसो दूर ठेवले आहे. या संघटनेचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजी राजे व स्व.राष्ट्रसंत भय्युजी महाराज असून त्यांची संघटनेच्या प्रत्येक अधिवेशन व मेळावे यांना लाभलेली उपस्थिति ही कामाची पावती आहे. सलग पाच राज्यस्तरीय अधिवेशन व सहा वर्धापन दिन या संघटनेचे साजरे झालेले आहेत. मराठा दसरा मेळाव्याचे ही चार वर्ष पूर्ण झाली आहेत. संघटना राज्यस्तरावर जोमाने वाढत असताना आंदोलनेही तितक्याच ताकतीची महाराष्ट्रात उभे करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी छावा क्रांतिवीर सेने मधील प्रत्येक पदाधिकारी जिवापाड मेहनत घेत असल्यामुळे संघटनेचे हे रोपटे आज वटवृक्ष मध्ये रूपांतर करत आहे.
शेतकरी कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी सुकाणु समितीतून लढा : किसान क्रांतीत छावा क्रांतीवीर सेनेच्या अनेक पदाधिकारी व सदस्यांचे महत्वाचे योगदान आहे. सुकाणु समितीच्या माध्यमातून करण यांनी महाराष्ट्रभर दौरे केले व राज्यभर पदाधिकारी सोबत मेळावेही घेतले, वेळप्रसंगी आंदोलनही केले. आंदोलनामुळे गुन्हे दाखल होऊन पंढरपुरसह इतर काही ठिकाणी तुरुंगवास देखील भोगावे लागले. परंतु शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे, शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावा , कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने आयात व निर्यात याचे धोरण आखावे यासाठी आजही आंदोलने सुरु आहे.
मराठा क्रांती मोर्चात विशेष योगदान :
मराठा क्रांती चळवळीत नाशिक जिल्ह्याच्या मोर्चात छावा संघटनेचे कार्य खूप महत्वपुर्ण आहे.सर्वोत्कृष्ट मोर्चा म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद आहे. करण गायकर हे मराठा क्रांती मोर्चा चे महराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणून काम पाहत असून , मराठा क्रांती मोर्चा मध्ये त्याच्या विचाराणा विशेष स्थान आहे. मराठा क्रांती मोर्चा घेण्यासाठी सर्वात पहिले पुढे येऊन वरद लक्ष्मी लॉन्स याठिकाणी समाजबांधवांना आव्हान केले. त्यासाठी जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यात जाऊन समाजबांधवांच्या बैठका घेतल्या . व मोर्चाची नियमावली समजून सांगितली . हे सर्व करत असताना विविध जाती-धर्म तील नेते, सामाजिक संस्था यांना सोबत घेण्याचे काम करण यांनी या वेळी केले. तळेगाव घटनेतील व व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केलेल्या आंदोलनात अनेक युवकावर केसेस झाल्या या केसेस मागे घेतल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करून केस रद्द केल्या. मुंबई मोर्चात छावा क्रांतीवीर सेनेसह छावा प्रतिष्ठानचेही कार्य महत्त्वपुर्ण आहे.मुंबई मध्ये चक्का जामकरण्यात आला होतो. मुंबई महामोर्चा वेळेस सरकार सोबत चर्चा करण्यास करण पुढे होते. समिति चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबत चर्चा करून मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात भूमिका स्पष्टपणे मांडून नाशिक सह इतर जिल्ह्यामध्ये मोर्चाचे प्रतिनिधित्व केले. मराठा वसतिगृहाचा प्रश्न,मराठा मुलामुलींना ५० टक्के फि सवलत,आण्णासाहेब पाटिल महामंडळ माध्यमातून अनेक तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळवून देणे , या साठी योग्य पाठपुरावा करुन ते यशस्वी केले. आजही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत सतत चर्चा करून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालय मध्ये कसे टिकवता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारवर दबाव तयार करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या बैठकांमध्ये सहभागी होऊन ही स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
कोरोना महामारीत मदत : कोरोना महामारी मुळे अखंड महाराष्ट्र हादरला होतो. सलग तीन महिनेराज्यात लॉकडाऊन असल्या मुळे गोरगरीब मंजूर व कामगार यांचे खूप हाल होत होते. अशा अवस्थेत करण यांनी छावा क्रांतिवीर संघटने च्या माध्यमातून राज्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांना एकत्रित आणून नाशिक जिल्हा व शहरातील हजारो कुटुंब पर्यंत अन्न-धान्य, किराणा, भाजीपाला, कांदे आदी जीवनावश्यक वस्तू चा पुरवठा केला. हा उपक्रम सपूर्ण राज्यात तेथील जिल्ह्या मध्ये राबविण्यात आला.
छत्रपतींचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली छावा प्रतिष्ठानमधुन गड-किल्ले संवर्धन मोहीम –
महाराष्ट्राच्या ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुढील हजारो पिढ्या ना जाणीव करून देणारे गड-किल्ले राज्यात आहेत. यातील अनेक गड-किल्ले शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे गड-किल्ले संवर्धन झाले पाहिजे, यासाठी करण यांच्या मार्गदर्शनाखाली छावा प्रतिष्ठान हे राज्यातील अनेक जिल्ह्यांत गड-किल्ले संवर्धन अर्थात दुर्गसंवर्धन करत आहे. राज्यभर प्रतिष्ठानचे ३५ हजार पेक्षा जास्त सदस्य आहे.गड-किल्ल्याचे संवर्धन करीत आहे.
छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजन – छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून दरवर्षी नाशिक जिल्हा व शहरा मधील विद्यार्थी गुणगौरव सोहळाचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थांचा गौरव केला जातो. राज्यात इतर जिल्ह्या मध्ये देखील तेथील पदाधिकारी गुणगौरव सोहळाचे आयोजन करतात.
छावा आणि दसरा मेळावा – संघटनेच्या वतीने दरवर्षी दसरा मेळावाचे आयोजन केले जात आहे. मराठवाडा पासून सुरु केलेला मराठा दसरा मेळाव्याची व्याप्ती वाढली असून मोठ्या प्रमाणात त्याचे आयोजन केले जाते.
आझाद मैदानावर आंदोलन :
आझाद मैदान येथे दि.१३ व १४ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण स्थगिती हटवावि व नियुक्तीच्या प्रतीक्षेत असले २ हजार १८५ उमेदवार ज्यामध्ये तलाठी, मेट्रो, राज्यसेवा, महावितरण , यांना न्याय मिळवा यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने करण यांनी समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका पार पासून आझाद मैदान दणाणून सोडले व आंदोलन यशस्वी केले.
सारथी शिक्षण संस्थेतील तारादूतांच्या प्रश्न सोडवण्यात यश : करण गायकर यांनी पुणे येथील सारथी कार्यालयाच्या समोर उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत सारथी संस्थेतील प्रशासनाला धारेवर धरत जोरदार निदर्शने केली व तारादूतांच्या न्यायिक मागण्यां संदर्भात तात्काळ लेखी आश्वासन द्यावे अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर यावर तात्काळ सारथी शिक्षण संस्थेतील संचालक मंडळाची बैठक असल्याने आंदोलन चिघळून परिस्थिती हाताबाहेर जावु नये या करिता संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अशोक काकडे यांची आंदोलक व उपोषणकर्ते यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व या सर्व संदर्भातील सविस्तर पत्र दिले.तब्बल सोळा दिवस कुंभकर्णा सारख्या निद्रिस्त अवस्थेत झोपलेल्या या प्रशासनाने पुढील कार्यवाही करीत तारादूतांबाबत तात्काळ निर्णयाचे लेखी आदेशाचे पत्र दिल्यानंतर उपोषणास बसलेल्या तारादूतांनी उपोषण मागे घेतले.छावा क्रांतीवीर सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच या आंदोलनाला यश प्राप्त झाले.
करण गायकर यांचा विविध पुरस्काराने सन्मानित – बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावर केलेली आंदोलने व मोर्चे यांच्या माध्यमातून इतर समाज बांधवांना देखील न्याय मिळवून देण्याचे फलित म्हणून विविध पुरस्काराने करण गायकर यांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने ‘बिरसा मुंडा, पुरस्कार सन्मानित
राष्ट्रसंत भय्यूजी महाराज व राज ठाकरे यांच्या हस्ते ‘भारत माता भूमिपुत्र, पुरस्कारा’ने सन्मानित
माजी मंत्री व वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते सातपूर सन्मान पुरस्काराने सन्मानित
छत्रपती संभाजी राजे व ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार
राष्ट्रसंत भय्यूजी महाराज ,मुंबईचे महापौर विश्वेश्वर महाडिक यांच्या हस्ते कामगार रत्न पुरस्कार
युवराज छत्रपती संभाजीराजे नामदार पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित





