नाशिक मिरर : 
पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मुक्त वाव द्या,अथवा शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांनी बुडविलेले पैसे परत करण्याची हमी द्या असे आवाहन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसह प्रशासनाला केले आहे.
सचिन पाटील यांनी नाशिकचे पोलीस अधिक्षक म्हणून जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्कालीन विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी विविध पातळीवर उपाय योजना केल्या होत्या,याआधी कांदा,द्राक्षे या रोकडा पिकासोबत अन्य भुसार भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून ठगविण्याचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले होते,विशेषतः कांदे आणि द्राक्षे व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून मालाचे पैसे न देता फरार होण्याच्या असंख्य प्रकार घडलेत.या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना करोडो रूपयांना चुना लावल्याने अनेक शेतकरी कुटूंब देशोधडीला लिगले आहेत.कर्ज काढून पिकवलेला शेतमाल व्यापाऱ्यांनी लुटल्याने आनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली असतांना तत्कालीन स्पेशल आयजी दिघावकर आणि एसपी सचिन पाटीला यांनी बुडालेले पैसे शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी व्यापाऱ्यांना कायदेशीर धडा शिकविण्याची मोहीम हाती घेतली.काही शेतकऱ्यांना बुडालेले पैसे मिळवून दिले तर काहींना पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एसपी पाटील यांची अचानक बदली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पैसे बुडणार या भितीने नैराश्य निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण बनून आलेले सचिन पाटील यांची कार्यकाळ पुर्ण होण्याआधी झालेली बदली जिल्ह्यावर झालेला अन्याय आहे असा संदेश पसरला आहे.

बदली रद्द झाली नाहीतर पैसे मिळणारच नाहीत ही भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने ही बदली रद्द करावी यासाठी शेतकरीही रस्त्यावर उतरला असून एकतर ही बदली रद्द करा नाहीतर व्यापाऱ्यांनी बुडवलेले पैसे परत करण्याची हमी पालकमंत्री आणि प्रशासनाने घ्यावी अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी सर्व सामाजिक संघटना शेतकरी संघटना राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी यांचे सर्वांचे निवेदन एकत्र करून ते निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना दिले आहे. यावेळी निवेदन देताना शेतकरी नेते राजू देसले, करण गायकर, रघुनाथ पाटील, शरद मालसाने नितीन सातपुते, शांताराम शिंदे, महेश आहेर, प्रथम कदम, प्रमोद हिरे, पोपट नाठे ,भारत शिंदे, खंडेराव गोसावी, सदाशिव गायकवाड, सुनील शिंदे ,संजय पाटील, आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!