नाशिक मिरर : सातपूर व गंगापूर पोलीस कार्यक्षेत्र परिसरात गणेश उत्सव व विसर्जन काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी; तसेच गणपती विसर्जन शांततेत व्हावे यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवारी गंगापूर व सातपूर पोलिस स्टेशन च्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने संचालन करण्यात आले.यामध्ये गंगापूर पोलीस स्टेशन चे ७ पोलीस अधिकारी ,९७ पोलिस अंमलदार, व ८ वाहने सहभागी होते.कॉलेज रोड, संतकबीर नगर, शिवाजी नगर, गंगापूर गाव, आनंदवली आदी ठिकाणी संचलन करण्यात आले.
सातपूर पोलीस स्टेशन च्या वतीने स्वारबाबानगर, राजवाडा,निगळ गल्ली ,शनी गल्ली, सातपूर मेन रोड,सातपूर कॉलनी भागांतून सशस्त्र संचलन करून जनतेला शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी; तसेच गणपती उत्सव शांततेत व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा केला जावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले. यावेळी गंगापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या सह सहायक आयुक्त सोहेल शेख,सातपूर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ निरीक्षक किशोर मोरे,सह ८ पोलीस अधिकारी,६५ कर्मचारी,२० एसआरपी जवान, दंगा नियंत्रण गाडी, सह संचलन करण्यात आले.गावातील रस्त्यावरून संचलन करण्यात आले.

