`पंचवटी अमृततुल्य’ म्हणजे तरूणांसाठी हक्काचा ब्रॅण्ड आहे. तुषार भोसले यांचा आदर्श तरूणांनी घेऊन उद्योजक-व्यावसायिक बनावे –  रंजना भानसी, माजी महापौर

नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

अशोकस्तंभ येथे `पंचवटी अमृततुल्य चहा आणि वडापाव’चे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. मंगळवारी (दि.14) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला.

यावेळी मान्यवरांचे स्वागत भोसले परिवाराच्यावतीने करण्यात आले. `पंचवटी अमृततुल्य’ शाखेचे संचालक व छत्रपती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तुषार भोसले आणि पंचवटी अमृततुल्य परिवाराच्यावतीने मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर रंजनाताई भानसी, माजी आमदार शिवाजी सहाणे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते अरुण पवार, छत्रपती युवा सेनेचे राज्य समन्वयक पुष्पाताई जगताप, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यश बच्छाव, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगलताई शिंदे, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख रोहिणीताई दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष मयूर दाते, नाना  जगताप त्याचबरोबर पक्षाचे, संघटनेचे विविध मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी पंचवटी अमृततुल्य चहाचा आस्वाद घेऊन त्याच्या चवीबद्दल समाधान व्यक्त केले. नाशिककरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नाशिककरांचा हक्काचा ब्रँड म्हणजे `पंचवटी अमृततुल्य चहा’ अशा शब्दात मान्यवरांनी यावेळी गौरव केला.

भविष्यात `पंचवटी अमृततुल्य चहा’च्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल, असा आशावाद व्यक्त करून `पंचवटी अमृततुल्य चे हे वादळ फक्त महाराष्ट्रात मर्यादित न राहता  देशातील अनेक राज्यात गेले पाहिजे असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.

`पंचवटी अमृततुल्य’ला अल्पावधीतच मिळालेले यश कौतुकास्पद असून कॉन्टिटी आणि
क्वालिटीचा दर्जा उत्तम राखण्यासाठी कुठलीही कॉम्प्रमाईज करत नाही. त्यामुळेच आज राज्यातील जनतेच्या मनावर `पंचवटी अमृततुल्य’ अधिराज्य गाजवत असल्याचे, मत छत्रपती युवा सेना संस्थापक अध्यक्ष तथा `पंचवटी अमृततुल्य’चे संचालक गणेश कदम यांनी व्यक्त केले
या वेळी मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

`पंचवटी अमृततुल्य’ चहा म्हणजे बेरोजगार तरुणांसाठी ही रोजगाराची सुवर्णसंधी आहे.
            – नितीन भोसले, माजी आमदार

 

`पंचवटी अमृततुल्य’ म्हणजे तरूणांसाठी हक्काचा ब्रॅण्ड आहे. तुषार भोसले यांचा आदर्श तरूणांनी घेऊन उद्योजक-व्यावसायिक बनावे.
            –  रंजना भानसी, माजी महापौर

गणेश कदम यांच्यामुळे हजारो तरुणांना `पंचवटी अमृततुल्य’च्या माध्यमातून रोजगार मिळणार
            – अरुण पवार – भाजप गटनेते, नाशिक महापालिका.

 

गणेश कदम म्हणजे तरुणांना रोजगार देण्याचं आणि उद्योजक बनवण्याचं उत्तम माध्यम आहे.
– शिवाजी सहाणे – नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

 

बातम्या

Don`t copy text!