नाशिक मिरर :
सातपूर-अंबड लिंकरोड परिसरातील दत्त मंदिर परिसरातील चार चाकी गाडीतून , सव्वालाखरूपये लंपास केल्याची घटना सोमवार (दि १३) रोजी घडली आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र नारायण महाजन राहणार अश्विन नगर अंबड यांची वीर जवान सर्व्हिस ही फर्म असून सोमवारी दुपारी जनता बँक डिजीपी नगर अंबड येथून कामगारांचा पगार साठी सव्वालाख रक्कम काढले होते. त्यांच्या सेंट्रो गाडी क्रमांक एम एच १५डी. सी.५०४९या गाडीच्या समोरच्या सिटवर पैसे ठेवले होते.सातपूर अंबड लिंक रोडवर दुपारी १ वाजेच्या दरम्यान फळ घेण्यासाठी थांबले असता ड्रायव्हर बाजूची काच अर्धी उघड्या असलेल्या काचेतून सीटवर ठेवलेले पिशवीत असलेले सव्वालाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
या बाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी बाबत गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पठाण तपास करत आहे.
