नाशिक मिरर :
सातपुर बस स्थानकाचे अनेक वर्षांपासून रखडलेले बांधकाम अंतिम टप्प्यांत आले आहे.सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने सर्वच कामाची वरिष्ठ पातळीवरुन समिती नेमून चौकशी करण्यात यावी व सदोष असलेले बांधकाम संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करुन घ्यावे. बांधकामाकडे दुर्लक्ष करणारे आधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन मनसेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना देण्यात आले.
सातपुर बस स्थानकाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. बांधकामास उद्घाटनापुर्वीचं तडे पडले आहेत. छत लिकेज झाल्याने छत व भिंतीमधून पाणी झिरपत आहे. ठेकेदाराकडून बांधकामास वापरात येणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे वापरल्यामुळे शासन निधीचा योग्य वापर न झाल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. तरी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन चौकशी करण्यात यावी. संबंधित दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मनसेचे महानगर संघटक विजय अहिरे,अभिजीत गोसावी, अक्षय घुगे,गौरव निमसे, निखील गुंजाळ,परेश पाटील,हेमंत काळे आदिनी केली आहे.
