लासलगाव : नाशिक मिरर वेबटीम बाबूलाल ब्रम्हएचा चॅरिटी बल ट्रस्ट तर्फे दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्यात आले. दिनांक ३ डिसेंबर रोजी लासलगाव महावीर विद्यालयाचे विश्वस्त जव्हेरीलाल ब्रम्हएचा ह्यांच्या निवासस्थानी जागतिक अपंग दिनाचे निमीत्त अकरा दिव्यांगांना सायकल वाटप करण्यात आल्या,अपंग नागरिकाचे पायी चालत जाणे शक्य नसल्याने त्यांचे हाल होऊ नये म्हणून दर वर्षी ट्रस्ट च्या माध्यमातून ब्रम्हएचा कुटुंब अपंग नागरिकाला काहीना काही वस्तू मदत देतात.सदर कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
यावेळी अपंग व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. ह्यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी चे तालुका अध्यक्ष विलास भालेराव,राजू सोनावणे,रायते काका,प्रदीप कापसे, महावीर जैन,शांतीलाल जैन,सुनील अब्बाड,महावीर चोपडा,प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष संध्या जाधव,गांगुर्डे साहेब,अशोक चव्हाण आदी हजर होते.(बातमी सौजन्य -प्रदीप कापसे,निफाड प्रतिनिधी)
