महिरावणी येथे काळाचा घाला; उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू

 नाशिक मिरर न्यूज : त्र्यंबकेश्वर रोडवरील महिरावणी येथील संदीप फाउंडेशनसमोर गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेसातच्या सुमारास एर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हिरामण गाटूजी वाघ (वय ६६, रा. महिरावणी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हिरामण वाघ हे महिरावणी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून दुचाकीने रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी एचआर ८७ जी ५५७७ क्रमांकाच्या एर्टिगा कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वाघ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Don`t copy text!