त्र्यंबकेश्वर : नाशिक मिरर वृत्तसेवा

सामाजिक बांधिलकी जपत ‘केअरिंग हॅन्ड सोशल संस्था’ (रजि. ठाणे) यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये गरजू कुटुंबांसाठी कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी ‘वरस विहीर’ आणि ‘हेदुलिपाडा’ परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.

“माणुसकीचे नाते जपूया, गरजूना मदतीचा हात देऊया” या ब्रीदवाक्याखाली आयोजित या कार्यक्रमात महिलांना साड्या तसेच लहान मुलांसह इतर नागरिकांना कपड्यांचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.

या उपक्रमाचे नियोजन संस्थेचे खजिनदार निखिल आर. जाधव यांनी केले. यामध्ये रूपा पाटील व भाविका खत्री यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच पत्रकार रामदास शीद यांनी उपस्थित राहून उपक्रमाला पाठबळ दिले.

या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा सामाजिक कार्यामुळे दुर्गम व वंचित घटकांना मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बातम्या

Don`t copy text!