१९ व्या वर्षी उत्सव होणार भव्य

नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर

       नाशिकच्या सातपूर परिसरात गुरु-शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जोती जन्मोत्सव २०२६ साठी नव्या कार्यकारणीची घोषणा उत्साहात करण्यात आली. यंदा या उत्सवाचे १९ वे वर्ष असल्याने परिसरात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. आयोजित बैठकीत एकोप्याच्या वातावरणात पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष इंजि. प्रवीण नागरे यांनी प्रस्तावना मांडत गेल्या वर्षातील कामांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रकाश महाजन यांनी यंदाच्या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोपटराव जेजुरकर यांनी केले.

यावेळी नगरसेवक नितीन निगळ, सोनाली भंदुरे, मानसी शेवरे आणि सविता काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून नवनियुक्त कार्यकारणीला शुभेच्छा देत यंदाचा उत्सव अधिक भव्य करण्याचे आवाहन केले.

यंदाचा जोती जन्मोत्सव क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ११ एप्रिल जयंतीनिमित्त सातपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

यंदा च्या जोती जन्मोत्सव २०२६ कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी भारत जाधव, कार्याध्यक्षपदी शिवाजी काळे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्षा मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर शिरसागर आणि प्रसिद्धीप्रमुख म्हणून सागर आनप यांची निवड करण्यात आली आहे.

कोअर कमिटी सदस्य म्हणून प्रकाश महाजन, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, गोविंद माळी, प्रवीण नागरे, राहुल साळुंखे, दीपक गांगुर्डे, मनोज तांबे, अशोक मंडलिक, तुषार भंदुरे, शिवाजी काळे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, हेमंत शिरसाट आणि बाळासाहेब भोजने यांचा समावेश आहे.

यावेळी संजिवनी जाधव, क्रांती जाधव, वैभव काळे, रावसाहेब अहिरे, दिलीप महाजन, महाजन नाना, माळी पेंटर, रवींद्र महाजन, आण्णासाहेब जावळे, सुनिल देवरे, लहुजी काळे, समाधान तिवडे, अश्विन महाजन, कोंडाजी नेटावटे, विकास सोनवणे, रमेश गवांदे, नितीन जाधव आदीसह सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी समितीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. यंदाचा जोती जन्मोत्सव सातपूर शहरात भव्य, आकर्षक आणि एकत्रित स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातम्या

Don`t copy text!