दिव्यांगांना मार्गदर्शनपर बैठक संपन्न
निफाड : नाशिक मिरर वेबटीम प्रदीप कापसे
निफाड येथे जागतिक अपंग दिनानिमित्त पंचायत समिती व भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे विशेष सन्मान सोहळ्या चे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पदाधिकारीयांचा परिचय करून देण्यात आला.व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष विलास भालेराव ह्यांनी दिव्यांगांच्या समस्या,त्यांच्यावर होणारे अत्याचार ,अन्याय, दिव्यांग आरोग्य योजना,निराधर महिला योजना,दिव्यागं विद्यार्थी शैक्षणिक समस्या,ज्या दिव्यांग महिला व युवक पुरुष स्वावलंबी होऊन व्यवसाय करण्यास तयार आहेत, परंतु बँक कर्ज प्रकरणात येणारे अडथळे,त्यांना सार्वजनिक ठिकाणी न मिळणारा मान,त्यांच्या घरकुल संबंधीचे प्रश्न ,शासनाकडून मिळणारा५% निधी तुटपुंजा असूनही चार ते पाच वर्ष उशिराने दिला जातो व त्या साठीही संघर्ष करावा लागतो. असे अनेक विषय त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी सानप साहेब,सोनवणे साहेब यांच्या समोर मांडले.या सर्व प्रकारच्या समस्या व त्यासंबंधी मार्गदर्शन पंचायत समिती तर्फे करण्यात आले. व शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यासंबंधी चे कागदपत्र,घरकुलाचे प्राप्त प्रस्ताव आदी अनेक विषयांवर चर्चा होऊन अपंग दिन साजरा झाला.कार्यक्रमास भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष विलास भालेराव ह्यांनी पंचायत समिती अधिकारी चे आभार मानले, प्रहारच्या जिल्हा अध्यक्ष संध्या जाधव,चंद्रभान गांगुर्डे,अशोक चव्हाण, राजू सोनावणे,रायतेकाका,पंचायत समितीचे प्रदीप केदारे,सह सर्व भाजपा दिव्यांग आघाडीचे जेष्ठ पत्रकार प्रदीप कापसे हजर होते,कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्र गीताने झाला.
