नाशिक मिरर वेबटीम :दिल्ली मध्ये शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती हायवेवर ठिय्या मांडून बसले आहेत .सरकार हे आंदोलन फोडण्याचा डाव करीत आहे.या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकऱ्यांनी १४ डिसेंबर रोजी संपूर्ण देशातील आपआपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शने आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत नाशिक येथील सीबीएस जवळील शिवाजी महाराज पुतळा , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व शेतकरी व इतर संघटनांनी घेतला आहे .माकप चे डॉ डी एल कराड यांनी आव्हान केले आहे की, धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांसह सहभागी व्हावे.धरणे आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदे, कामगार कायदे, विज कायदा २०२० ,नवे शैक्षणिक धोरण, बेरोजगारी बाबत अनेक वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत. हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेची व्यापक एकजूट करणे हे आपले उद्दिष्ट आहे .त्यादृष्टीने आपणा सर्वांचा सहभाग व्हावे पत्रकार परिषद ला माकप चे डॉ डी एल कराड, किसान सभा सुनील मालुसरे, काँग्रेस चे शरद आहेर, राष्ट्रवादी रंजन ठाकरे , भाकप चे राजू देसले, महादेव खुडे, शेकाप चे अड मनीष बस्ते, वंचित आघाडीचे वामनराव गायकवाड, बसपा चे अरुण काळे, राष्ट्र सेवा दल नितीन मते, अनिता पगारे, किरण मोहिते , शशी उनवणे आरपीआय कवाडे, अण्णासाहेब कटारे , छात्रभरती समाधान बागुल, अजमल खान, विराज देवांग सीआयटू चे सीताराम ठोंबरे, किसान सभेचे नामदेव बोराडे उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!