वेटर, भांडे घासणारे म्हणून हिणवल्या जाणाऱ्या ‘ कर्मवीर अमृततुल्य ‘ च्या यशस्वी व्यावसायिकाची उल्लेखनीय कहाणी

नाशिक मिरर विशेष :

      ‘जहा चाह है, वहाँ राह है’ अशी हिंदीत एक म्हण आहे. पण त्यात बदल करून ‘जहाँ चहा है, वहाँ राह है’ अशी नवी म्हण सत्यात उतरवणे आता आवश्यक आहे. चहा टपरी हा अगदी दोन-चार वर्षांपर्यंत सामान्यपणे पुरुषांनी चालविण्याचा किंवा अशिक्षितांनी करण्याचा व्यवसाय समजला जात होता.परंतु चहा हा मानवी जीवनातील लोकप्रिय पेय झाले असून चहाची विक्री करणारे मोठमोठे दालने सुरू झाले असून यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवसायाला चालना मिळाली आहे.अगदी इंजिनिअरिंग, एमबीए झालेला तरुण देखील अशा व्यवसायात उतरून नोकरी पेक्षा जास्त पैसे कमवत आहेत. चहाची दुकाने अगदी कुठेही पहावयास मिळतात.परंतु आता काळानुरूप हाच रस्ताच्या कडेला कुठेही मिळणारा चहा आता, चकाकत्या एलईडी लाईट, सुंदर सजवलेले दुकाने, रेस्टॉरंट,बसण्यास सुंदर टेबल व बाके, सोबत वेगवेगळ्या फ्लेवर चे चहा मसाला चहा पासून तर आयुर्वेदिक चहा असे विविध चवी मध्ये मिळत आहे.त्याला कारण तसेच आहे. प्रत्येकाची दिवसांची सुरुवात चहा ने आणि कामाचा शेवट देखील चहा ने झाल्या शिवाय राहत नाही. माणसाचे राहणीमान देखील सतत बदलते असल्या मुळे रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या चहा ने देखील कात टाकून आता चहा चे मोठमोठे रेस्टॉरंट, कॅफे शहरासह ,तालुक्याच्या ठिकाणी अगदी खेडे गावात देखील सुरू होत असून त्यास चहा प्रेमी चा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.मित्र-मैत्रिणी भेट, नवीन कल्पना चा जन्म या सर्वांचा साक्षीदार एक चहा नक्की च असतो.

मैत्रीच्या नात्याचा रंगच वेगळा असतो. अशाच चार मित्रांच्या माणुसकीच्या रंगांची, त्यांच्यातील रुजलेल्या भावनांच्या खोल तळाची, विश्वासाच्या अदृश्य किनाऱ्याची व चार मित्रांनी एकत्र येत नवीन संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवली आणि आज यशस्वी व्यावसायिक व उद्योजक झालेत यांची गोष्ट आपण आज नाशिक मिरर विशेष मध्ये वाचणार आहोत.

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीसाठी सुप्रसिद्ध असणारे शहर म्हणजे नाशिक. नाशिक मधील प्रत्येक नाशिककराला मी नाशिककर असल्याचा अभिमान वाटल्या शिवाय राहत नाही. नाशिक शहरात श्री.अमोल वाघ, श्री.महेश लोखंडे व श्री.भाऊसाहेब पवार, श्री.लक्ष्मण निकम हे मित्र वेगवेगळ्या हुद्द्यांवर नोकरी करत होते. तिघांचेही मन नोकरीत काही रमत नव्हते. परंतु चौघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नोकरी करण्यावाचून पर्याय नव्हता. अशाही परिस्थितीत तिघांच्या मनात एक व्यावसायिक वृत्ती जन्म घेत होती.कारण चौघे मित्र कधीही एकत्रित आले कि,चहा आणि गप्पांची सुरुवात व्हायची ती व्यवसायाने आणि शेवट व्हायचा तो व्यवसाय कोणता करायचा ? या एका अनुत्तरित प्रश्नाने.

 

चौघेही नोकरी करत करत रोज नवनवीन व्यवसायाचा शोध घेत होते. अशातच एके दिवशी २०१८ साली त्यांची भेट झाली ती पुण्याचे नामांकित व्यावसायिक पॉकेट कॅफे या सुप्रसिद्ध ब्रँडचे मालक श्री.अभिजित घाटगे सर यांच्या सोबत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायास सुरुवात करायची हे चौघेचही पक्कं झालं. चौघानी मिळून एका बँकेतून व्यवसायासाठी कर्ज घेऊन पॉकेट कॅफेची पहिली फ्रँचायझी नाशिक शहरात उघडली.

सुरुवातीपासूनच जबाबदारीने व झपाटून नियोजनबद्ध कामास सुरुवात केली. व्यवसायास मोठा प्रतिसाद मिळू लागला. मित्राच्या एकीचे यश पाहता काही मंडळींच्या नजरेत खुपायला लागले. अनेक जण वेटर, भांडे घासणारे अशा शब्दांनी हीनवत होते. परंतु व्यवसायाचा मंत्र यांना पक्का माहीत होता. तो म्हणजे “लोक करतात जेव्हा निंदा समजून घ्यायचं चालू लागला आपला धंदा”. याकडे जाणीवपूर्वक यांनी दुर्लक्षित केलं.

पुढे जाऊन काही दिवसात एका पॉकेट कॅफेचे दोन पॉकेट कॅफे नाशिक शहरात झाले. त्यासही चहा प्रेमी, खाद्य प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिजित सरांच्या वेळोवेळी लाभणाऱ्या मार्गदर्शनामुळे व यांच्यातील एकी, ध्येयप्राप्ती व विश्वास यामुळे यांनी स्वतःचा एक नवीन “कर्मवीर अमृततुल्य” या नावाने चहाचा ब्रँड सुरु केला. गंम्मत म्हणजे सुरु करण्यापूर्वी चौघेही प्रचंड दडपणाखाली होते. आपल्याला हे जमेल ना ? त्यात त्यांना आठवायचे “वेटर, भांडी घासणारे” असे लोकांनी हिनवलेले, प्रहार केलेले शब्द. तरीही एकीचे बळ वापरून हे मित्र यात उतरले व अगदी स्वस्त आणि मस्त चव असणार चहाच फ्रँचायझी मॉडेल यांनी तयार केलं.

आज “कर्मवीर अमृततुल्यच्या” महाराष्ट्रात २७ च्या वर शाखा यशस्वीपणे चालू आहेत. यामध्ये फक्त 1.5 ते 2 लाखांच्या गुंतवणुकीत या ब्रॅण्डची फ्रँचायझी उभारून तुम्ही सुद्धा यशस्वी उद्योजक बनू शकता.

 

महाराष्ट्रातील इतर चहाच्या ब्रँडच्या तुलनेत कर्मवीर अमृततुल्य हा ब्रँड अनेक चहा प्रेमींच्या व व्यावसायिकांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे. जर तुम्ही ही व्यवसायाची संधी शोधत असाल आणि “कर्मवीर अमृततुल्य” सुरू करण्यास इच्छुक असाल तर आजच संपर्क साधा.
+918014146363, +918830766619, +919689804272, +919226350010

 

बातम्या

Don`t copy text!