नाशिक मिरर वृत्तसेवा :

प्रभाग क्रमांक ९ मधील श्रमिकनगर, तुळजा भवानी चौक, गंगासागरनगर, हिंदी शाळा परिसर आणि इतर भागांमध्ये अनेक वर्षांपासून उघड्या विजतारांचा गंभीर प्रश्न प्रलंबित आहे. या जिवघेण्या वीजतारा तातडीने भूमिगत करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी शिवसेनेचे नाशिक उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांनी महावितरण अधिकारी रिचवाल यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

       स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, घरांच्या अगदी जवळून जाणाऱ्या या विजतारांना बाल्कनीमधून मुलांचा किंवा नागरिकांचा नकळत स्पर्श होण्याची शक्यता आहे. यामुळे जीवघेण्या दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला असून, अशा प्रकारच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत.

कांडेकर यांनी सांगितले की, “या प्रश्नाबाबत महावितरण प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाने याची तत्काळ दखल घ्यावी; अन्यथा नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

 

या प्रसंगी कावेरी कांडेकर, दामोदर जाधव, सुरेश भुजबळ, विद्या कोकणे, जयश्री बेहेरे, किरण बेरसे, सोमनाथ खेरनार, अर्जुन शिनगाव, शेखर भास्कर, संजय राजोळे, पी. आर. सिंग, रोहित हसे, गौरव पवार, रवी त्रिपाठी, दत्ता पठाडे, प्रतिभा पुसे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!