जमीन खंडणीप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा
नाशिक मिरर वृत्तसेवा :
       सातपूर परिसरात जमीन खंडणी आणि बेकायदेशीर कब्जा प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचे पुत्र दीपक आणि भूषण लोंढे यांच्यासह आठ जणांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी शाहू बाबुराव म्हस्के (वय ७६, रा. कामटवाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सातपूर शिवारातील सर्वे नं. १८३/१ पैकी २३ गुंठे जमिनीवर आरोपींनी बेकायदेशीर कब्जा केला.
दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपी दीपक लोंढे ऊर्फ नानाजी, प्रकाश लोंढे ऊर्फ बॉस, भूषण लोंढे ऊर्फ भाईजी यांनी इतर सहकाऱ्यांसह संगनमत करून जमिनीवर ताबा मिळवला.
फिर्यादींनी जमीन विक्रीस काढल्यावर दीपक लोंढे याने धमकी दिली की,
 “ही जमीन माझ्या सांगण्याप्रमाणे भावात मला विकावी लागेल, अन्यथा कोणालाही ती खरेदी करू देणार नाही!”
असे सांगून खंडणी मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सदर आरोपींपैकी काहींवर यापूर्वीच खून, खंडणी, दरोडा, धमकी, शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलिस ठाण्यांत आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी केले असून सहायक पोलिस निरीक्षक भडांगे आणि पठाण पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, सातपूर गोळीबार प्रकरणानंतर आता पुन्हा एक गंभीर गुन्हा नोंदवला गेल्याने, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचे पुत्र यांचे अडचणीचे वर्तुळ आणखी घट्ट झाले आहे.

बातम्या

Don`t copy text!