नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी म्हसरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे राज्य अध्यक्ष डाॅ. संघपाल उमरे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. सर्वांच्याच अडचणी समजावून घेऊन आपण त्या सोडविण्यावर भर देऊ, असे परदेशी यांनी सांगितले. परदेशी विविध सामाजिक संस्था व संघटनांवरही कार्यरत आहेत.
