सातपूर मध्ये नागरिकांची बेजबाबदारपणे वावर
नाशिक मिरर :
सातपूर – अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाच्या दुसरी लाटे मध्ये देखील परिस्थिती नियंत्रणात असून सद्या एकूण ६०० पेक्षा जास्त अँक्टिव्ह रुग्ण आहेत.तर वर्षभरात आतापर्यंत एकूण ८० रुग्ण आपले प्राण दगावले आहेत.सातपूर – अंबड औद्योगिक वसाहती मध्ये लाखो कामगाराची कामानिमित्त रोजची रहदारी असते.सातपूर -अंबड,सिडको औद्योगिक वसाहतीमध्ये स्वरूपी वास्तव्यास आहेत.कामानिमित्त रोज शेकडो कामगारांशी एकमेकांचा संपर्क येतो.परंतु अद्याप औद्योगिक वसाहती मध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे.कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन सूचना केल्या असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे.परंतु परिसरातील नागरिक व व्यापारी, दुकानादार नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदार पणे वागत असल्याचे दिसुन येते.
सायंकाळी ७ नंतर दुकाने बंद करण्यास सांगून देखील बऱ्याच ठिकाणी दुकाने उघडी असतात.मास्क चा वापर न करणे, सामासीक अंतर न पाळणे, गर्दी करणे आदी कृती करून कोरोना व्हायरस फैलावनास कारणीभूत ठरत आहेत.पोलीस व मनपा प्रशासन अधिकारी व कर्मचारी बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करत आहेत.परंतु तरी देखील नागरिक कोरोना व्हायरस च्या दुसऱ्या लाटेस गांभीर्याने घेत नसल्याने दिसून येत आहे.कारखान्यामध्ये देखील सुरुवातीला सर्व नियमांचे पालन केले जात होते.परंतु आता काही बड्या कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्या मध्ये तापमान चेक करणे, आरोग्य तपासणी करणे, कामाचे ठिकाण सॅनिटाईझ करणे, आदी नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे.सदर नियमांचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे.
सातपूर मधील सद्यस्थिती
एकूण कोरोनाबाधित : ७२००
अँक्टिव्ह रुग्ण : ६००
रुग्णालयात दाखल :२२५
होम क्वांरटाईन : ३७५
कोरोनामुक्त :६५२०
मृत्यू : ८१
कोविड सेंटर : ०१
खाजगी रुग्णालये : ०३
सातपूर शहर परिसरातील नागरिकांनी कोरोना व्हायरस बाबत शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक, दुकाने, आस्थापना यांच्या वर कारवाई करण्यात येईल. – नितीन नेर,सातपूर विभागीय अधिकारी नाशिक मनपा
