नाशिक मिरर :
नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होवून त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही नेमणूक केली आहे.

 

कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांना दररोज लागणाऱ्या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात ऑक्सिजन चा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व बाबींचे समन्वय करण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास हे संपूर्ण जिल्ह्याकरिता संनियंत्रण अधिकारी म्हणून पाहतील.

 

अशी असेल संनियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी :
अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी श्रीवास यांनी ऑक्सिजन ची माहिती संकलनाबरोबरचं खाजगी रुग्णालयांना भेटी देवून सर्व रुग्णालयांना तज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसारच ऑक्सिजनचा वापर होतो किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच आक्सिजन वाया जाणार नाही याबाबत दक्षता घेत याची दक्षता घेत खात्री करावी. प्रत्येक रुग्णालय रुग्णांस स्वत: ऑक्सिजन घेण्यास सांगतात किंवा कसे याची देखील खात्री करण्यात यावी. आवश्यकतेपेक्षा जास्त कालावधीसाठी ऑक्सिजन लावू नये याबाबत भेटी दरम्यान रुग्णालयांना सूचना देण्यात याव्यात. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णास ऑक्सिजन पुरवठा खंडीत होणार नाही, याबाबत दक्षता घेवून केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे, आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे.

हॉस्पिटल निहाय ऑक्सिजनचे वापरावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवून जर अपरिहार्य परिस्थिती मध्ये ऑक्सिजन ची गरज निर्माण झाल्यास त्याबाबत समन्वय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करतील व ऑक्सिजनचे अतिरिक्त गरज अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांचे समन्वयाने पूर्ण करून घेतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या

Don`t copy text!