नाशिक मिरर वेबटीम : जगभरासह आपल्या देशात कोरोना व्हायरस कोविड १९ या महारोगाने मार्च २०२० पासून देशवासियांना आपले शिकार करण्यास सुरुवात केली. रोज हजारो नागरिक बाधित होत होते.यामुळे देशासह आपल्या महाराष्ट्र राज्यातील अर्थव्यवस्था ठप्प झाली. यामुळे तंत्र व यंत्र भूमी म्हणून ओळख असलेला औद्योगिक जिल्हा नाशिक देखील अपवाद ठरला नाही येथील उद्योग व्यवसाय ठप्प झाला. यामुळे सातपूर- सिडको-अंबड औद्योगिक वसाहतीचा भाग असल्याने सर्वाधिक फटका येथील गरीब कामगार यांना बसला. काम बंद झाल्याने रोजगार नाही. त्यामुळे रोज खायचं काय असा प्रश्न मोलमजुरी, रोजनदारी, बांधकाम कामगार, परंप्रांतीय, कंत्राटी कामगार यांच्या पुढे उभा राहिला. कोरोना संकट काळातील ८ महिन्यांपासून प्रभागातील गरजू व परप्रांतीय नागरिकांना अन्नधान्य वाटपाचे काम करणाऱ्या प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका माधुरी गणेश बोलकर व गणेश बोलकर या कुटूंबाने अनेकांना मदतीचा हात या काळात दिला. या काळात गरजूंना दोन वेळचे जेवण, औषधोपचारासाठी आर्थिक मदत, संपूर्ण प्रभागात हाईपोफ्लोराईट औषध फवारणी केली.८०० हुन अधिक कुटुंबाना किराणा किट वाटप, १८ एप्रिल ते ३ मे भाजपच्या अटल भोजन योजनेअंतर्गत दरम्यान २१ हजार नागरिकांना जेवण पार्सल दिले, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक गोळ्या वाटप, प्रभागातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्याचे काम माधुरी बोलकर व गणेश तुकाराम बोलकर यांनी केले. रुग्ण सेवा करीत असताना त्यांना कोरोना ची लागण देखील झाली.परंतु यावर मात करून पुन्हा नव्याने गणेश बोलकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शिबीर सुरू करून स्वतः त्यात सामील झाले.
सातपूर येथील नगरसेवक माधुरी बोलकर व त्यांचे पती खरेच गणेश बोलकर यांनी कोरोनाच्या संकटात प्रभागातील गरीब व गरजूंना अन्नदान किराणा वाटप केले. व रॅपीट अँटीजेन टेस्ट सेंटर तयार करून प्रभागातील नागरिकांसोबत सातपूरकर यांची सेवा करत सामाजिक बांधिलकी जपली. संकटात सर्व घरात बसून असताना प्रभागातील नागरिकांसाठी धावाधाव करणारे बोलकर कुटुंब त्यामुळेच अनेकांना आदरवड लागले.आपत्कालीन परिस्थितीत गरजू, गोरगरिबांना मदतीचा हात देऊन लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचे एक जिवंत आदर्श उदाहरण बोलकर दाम्पत्याने राजकारण्या समोर ठेवले आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेत माजी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे आदीं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. करुणा काळात नगरसेवक माधुरी त्यांचे पती गणेश तुकाराम बोलकर यांनी अशोक नगर, सावरकर नगर, विश्वास नगर, पवार संकुल, जाधव संकुल, सातपूर च्या इतर प्रभागातील परिसरातील नागरिकांसाठी स्वतःच्या खाजगी जागेत तपासणी सेंटर उभारले. आतापर्यंत ३८० रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर यंत्रणेने औषधे उपचाराला मदत केली. व कोरोना बाधित रुग्ण मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी उशीर होत असल्याचे निदर्शनास येताच त्या विरोधात आवाज उठवला व झालेल्या सुधारणा चे श्रेय बोलकर कुटुंबाला जाते.

अशा या समाजसेवक कुटुंबाला भावी कार्यासाठी नाशिक दर्शन दिवाळी अंक व दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे.

बातम्या

Don`t copy text!