एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही देण्यात येणार आहे.
तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे.
एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं.
यावेळी परब म्हणाले की, आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. दुःखी होऊन असं कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये. कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येतं. दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल, असं परब म्हणाले.
