सातपूर,गंगापूर पोलीस व सातपूर विभागीय कार्यालयाची संयुक्त कारवाई

नाशिक मिरर : नाशिक मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या व गंगापुर व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राज्य शासन व नाशिक मनपाने निर्देशित केलेल्या कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्यामुळे लॉकडाऊन काळात कारवाई करून तब्बल २५ लाख रुपयांचा दंड पोलिस व नाशिक मनपा च्या सातपूर विभागीय कार्यालय प्रशासनानी वसुल केला आहे.

कोरोना बाधित व विनाकारण फिरणार्या जनतेला कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य नसल्याने विविध कारणाने रस्त्यांवर येत असल्याने वाढत्या प्रादुर्भाव प्रसारास नागरिक जबाबदार असल्याने नाशकात रूग्ण संख्या वाढीस लागली आहे.यासाठी शासनाकडून दिलेल्या नियमांचे पालन करावे अती महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर निघू नये असे आवाहन विभागीय आधिकारी नितीन नेर यांनी केले आहे.

दरम्यान सकाळी ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत गंगापुर व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनपाने संयुक्तपणे ठिकठिकाणी नाकाबंदी करुन कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
कालावधीत विनाकारण फिरणाऱ्याची अँटीजन टेस्ट करण्यात आली.त्यात काही पॉझिटिव्ह सापडले.त्यांची कोविड केअर सेंटरला रवानगी करण्यात आली.

मास्क न लावता फिरणे, सामाईक अंतर न पाळणे, संचारबंदी चे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्यावरील हातगाडी, टपऱ्या उघड्या ठेवणे, ऑटो रिक्षा, खाजगी वाहन अशा विविध चालकांवर व नागरिकांवर कारवाई करण्यात आली.राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्या पाऊसन ६ मे २०२१पर्यंत विविध प्रकारच्या केसेस मध्ये सुमारे २५ लाख रुपयांचा दंड जमा करण्यात आला.

 

सातपूर विभागीय कार्यालय व गंगापुर-सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुुमारे २५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासन व तसेच मनपा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.
नितीन नेर ,सातपूर विभागीय आधिकारी

बातम्या

Don`t copy text!