नाशिक मिरर :

वाढता प्रादुर्भाव पाहून शहरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. विनापरवाना सभा, मोर्चा, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, बेकायदेशीरपणे विनापरवागी जमाव जमविला आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आदेशाचे उल्लंघन केले, या प्रकरणी नाशिक पच्छिमच्या आमदार सिमा हिरे व भाजपा नाशिक शहराध्यक्ष भाजपा पदाधिकाऱ्यांविरुद्ध सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या मुळे सातपूर अशोक नगर येथे भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

तसेचभाजपा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून फोटोलो जोडे मारत आंदोलन केले.

दरम्यान, कोरोना व ओमायक्राँन या धोकादायक आजाराच्या विषाणूचा संसर्ग होऊन, जनहित धोक्‍यात घालून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य यावेळी आंदोलकांकडून झाले. विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास जाणीवपूर्वक कृत्य करून पोलिसांच्या कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले. आमदार सिमा हिरे,शहराध्यक्ष गिरिष पालवे,महेश हिरे,नगरसेविका इंदुबाई नागरे,भगवान काकड, चारुदत्त आहेर, निलेश भंदुरे, गणेश बोलकर,अंबादास आहीरे,राजेश दराडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची नोंद सदर सातपूर पोलिस स्टेशन मध्ये झाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस ह.वा आहेर हे करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!