मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर करत समन्वयकांना फरपटत अटक

नाशिक मिरर :

मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर समन्वयकांना फरपटत अटक करणाऱ्या मराठा उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हानां यांचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करीत राजीनाम्याची मागणी केली असून मराठा क्रांती मोर्च्या च्या समन्वयकांनी विविध प्रलंबित मागण्या साठी अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थाना समोर आंदोलन केले.

 

मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष जर निवेदन घेऊन चर्चा करणार नसतिल तर राजीनामा द्यावा.लोकशाही मध्ये मंत्री बंगल्यात असुन जर जनतेला भेटनार नाहीत हा लोकशाहीचा अवमान आहे.

मराठा क्रांती मोर्चा राज्यभर अशोक चव्हानांचा निषेध करीत आहे. अकार्यक्षम अशोक चव्हानांनी राजिनामा द्यावा. आमदार अशोक चव्हाण सातत्याने मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. समाजाला वेगवेगळी आश्वासने देऊन ती पूर्ण न करता उलट समाजाचा घात हे करत आहे. याचा प्रत्यय प्रत्येक वेळी मराठा समाजाला आल्याने आज मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला अशोक चव्हाण यांच्या फसवेगिरी मुळे मराठा समाजात नैराश्य तयार झालेले आहेत. त्यामुळे अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळत नाही. सारथी शिक्षण संस्थेचा कारभार सुरळीत करण्यातही नामदार अशोक चव्हाण अपयशी ठरले आहेत.त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा निहाय वस्तीगृह प्रश्न ,तारादूत, एमपीएससी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जॉइनिंग, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या नोकरीचा प्रश्न, यापैकी एकही प्रश्न अशोक चव्हाणांना सोडवता आलेला नाही.

 

त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळ त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांना गेटच्या बाहेर बसवून सकल मराठा समाजाचा अपमान केलेला आहे. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की, नामदार अशोक चव्हाण यांचा मराठा आरक्षण उपसमितीच्या राजीनामा तात्काळ घेऊन, त्या ठिकाणी कार्यक्षम मंत्री महोदयांची निवड करावी. आज अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाचा घात करत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा जर महा विकास आघाडीने घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात मोठे तीव्र जनआंदोलन उभे राहिल या सर्वस्वी जबाबदार आपल्या शासन-प्रशासन असेल याची नोंद घ्यावी.

 

या आंदोलनामध्ये राज्य समन्वयक करण गायकर, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, अंकुश कदम, चित्रे पाटील , अप्पासाहेब कुडेकर , महादेव देवसरकर , गंगाधर काळकुटे, प्रमोद जाधव,नवनाथ शिंदे ,गणेश वाकचौरे, वैभव दळवी, प्रशांत शिरोळे, रोशन पवार, दुर्गेश कामठेकर, महादेव कदम, अशोक काळकुटे, स्वप्नील घरत,अभिजीत मोकळ, जितेंद्र ठाकूर, प्राजक्ता फले, अंकुश बागमारे,आनंद कोंडीलकर , राजेश मोकळ, दिनेश खडतरे, आदींसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!