नाशिक : प्रतिनिधी
या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशीच होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारत या स्पर्धेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. स्पर्धेचे पहिले 6 दिवस म्हणजे 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सामना खेळवला जाईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 चे सामने सुरू होतील.
भारताचे सामने असे :
– भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
– 23 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध गट अ उपविजेता, सिडनी क्रिकेट ग्राउंड
– 27 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ स्टेडियम
– 30 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेडवर
– 2 नोव्हेंबर
– भारत विरुद्ध गट ब उपविजेता संघ – मेलबोर्न
– 6 नोव्हेंबर
