नाशिक मिरर : दि.२१ रोजी सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्थेच्या नवनियुक्त सर्व संचालक मंडळाने छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्व संचालक मंडळाचा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर,विलास पांगरकर,नगरसेविका हेमलता कांडेकर, माजी नगरसेवक सदाशिव माळी, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर,सविता गायकर, प्रियंका गायकर, प्रमोद जाधव,कौतिकराव जाधव, विष्णुपंत घुगे, श्रीराम मंडळ, नवनाथ शिंदे,गुमानराव कुडे, संजय तुपलोंढे यांच्या शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना करण गायकर यांनी सांगितले की कशा पद्धतीने सेंट्रल गोदावरी सहकारी संस्थेच्या निवडणूकित विरोधी पॅनल ने मतदार बंधू भगिनींना चुकीची माहिती देत मतदान विभागण्याचा प्रयत्न केला परंतु माजी खासदार देविदास पिंगळे यांनी त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आपला पॅनलला भरघोस मतांनी निवडून आणले व अक्षरशः धुळ चारली.सेंट्रल गोदावरी संस्थेच्या सर्व नवनियुक्त यांना शुभेच्छा देत त्यांच्या कडून शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्व नवनियुक्त संचालकांना कुठेही काही अडचण आली तरी एक शेतकरी पुत्र म्हणून सदैव आमची मदत राहील. काही लोक जाणीवपूर्वक या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करून बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून सक्षम काम कस करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
काही लोक निवडणुका लाटतात निवडणुकीत पराभव झाला की खोटेनाटे आरोप प्रत्यारोप करत असतात त्यांची ती नेहमीची सवय आहे . महापालिकेतील एक नगरसेवक पद सोडता या लोकांना आजपर्यंत जनतेने कायम नाकारून घरी बसवलेल आहे. तरी आपल्याकडे म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, या म्हणीप्रमाणे ते वागत असतात. सगळे क्षेत्र त्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाटतात म्हणून ते खोटेनाटे आरोप करत असतील तर त्याकडे आपण लक्ष न देता विधायक कामाकडे लक्ष दिले पाहिजे, माजी खासदार देवीदास पिंगळे व इतर संचालकांच काम काम चांगले असल्याने शेतकऱ्यांनी तुम्हाला भरगोस मतांनी निवडून दिलेल आहे. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा आता याचं भान ठेवून शांत राहावे अन्यथा जशास तसे उत्तर द्यायला शेतकरी यापुढे बघणार नाही.
तसेच माजी खासदार देविदास पिंगळे बोलतांना म्हणाले की हा विजय मिळवणे हे सगळ्यांच्या यशस्वी साथीने शक्य झाले. जशी आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोधी पॅनलला चितपट केले त्याच पद्धतीने येत्या काळात या विरोधी पॅनल मधील निवडून आलेल्या सदस्याला तुम्ही तुमच्या प्रभागात चितपट करा त्यासाठी जी मदत लागेल ती मदत मी व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येईल. काही लोकांना स्वतःच्या पॅनलचे लोक निवडून आणता आले नाही परंतु गप्पा अशा मारतात की संपूर्ण पॅनल त्यांचा निवडून आलेला आहे. त्यामुळे आम्ही अशा लोकांकडे यापुढे दुर्लक्ष करून शेतकर्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न करू या अगोदर सुद्धा मी अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेल आहे. ते क्षेत्र नेहमीच फायद्यात ठेवलेले आहे मी ज्या वेळेस त्या पदावरून बाजूला झालो त्या त्या वेळची परिस्थिती आपण सर्वांनी बघितली आहे. कुठलीही संस्था उभी करायला खूप कष्ट करावे लागतात परंतु ती लुटायला एक दिवस पण लागत नाही. असेच काम मागील काळात विरोधकांकडून झालेले आहेत. त्यांनी फक्त फक्त लुटून खाण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जनता जनार्दनाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी व तानाजी पिंगळे विष्णुपंत म्हैसधुने त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मदतीने पुन्हा या बँकेवर पॅनल ची लोक निवडून आणू शकलो , त्याचे ऋण निश्चित येणाऱ्या काळात आम्ही चांगले काम करून दाखवू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी बँकेचे चेअरमन विष्णुपंत म्हैसधुणे माजी नगरसेवक सदाशिव दादा माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यामध्ये सत्कारमुर्ती म्हणुन माजी खासदार देविदास पिंगळे,तानाजी पिंगळे, संस्थेचे चेअरमन विष्णुपंत म्हैसधूने,
व्हा चेअरमन सौ.अनिता दाते, संचालक भाऊसाहेब खांडबहाले, अनिल काकड,प्रदीप कडलग,दौलतराव पाटील,श्रीनाथ थेटे,पंडित काकड,रमेश डंबाळे,दत्तात्रय थेटे,शांताबाई ढबले यांचे औक्षण करून सत्कार करण्यात आला.
परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिन्नर बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ भिसे यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव यांनी मानले.
