नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर विभागात महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ‘गुरु-शिष्य जयंती महोत्सव समिती’च्या वतीने आयोजित ‘जोती जन्मोत्सव २०२६’ अंतर्गत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. शनिवार, ११ एप्रिल रोजी अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर मुख्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रबोधनकार अभिजित गायकवाड (नाशिक) यांच्या महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाने झाली. त्यांनी फुले यांच्या कार्याचा आढावा घेत शिक्षण, समता व सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांच्या जाहीर प्रबोधनपर कीर्तनाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली. सप्तखंजेरीच्या तालावर सादर झालेल्या या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, स्त्री सन्मान, महिला सशक्तीकरण, सामाजिक समता व बंधुता यांवर प्रभावी भाष्य करण्यात आले.
महाराष्ट्र सह नाशिक मध्ये चर्चेत असलेले भोंदू खरात प्रकरणाचा खरपूस समाजार घेत महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडू नका असा संदेश दिला.
तसेच राष्ट्रप्रेम, संविधानिक कर्तव्ये व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून देत उपस्थितांमध्ये सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमास आमदार सीमाताई हिरे, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, मा. महापौर दशरथ आप्पा पाटील, माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, मा. स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख, छावा क्रांतिवीर सेना अध्यक्ष करण भाऊ गायकर, मा. नगरसेवक सुरेश नाना भंदूरे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, समाधान भाऊ देवरे, निवृत्ती अण्णा इंगोले, नगरसेविका माधुरीताई बोलकर, सविता ताई काळे, सोनाली ताई भंदुरे, मानसी ताई शेवरे, अंकिता ताई शिंदे, श्रीमती इंदुबाई नागरे, कविताताई नाईक, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, महिंद्रा अण्णा शिंदे, नरेश सोनवणे, डॉ. वृषाली सोनवणे, अशोक पारखे, संजय तांबे, देवा जाधव, सचिन आबा गांगुर्डे, मुन्ना तुपे, संदीप पवार, भगवान काकड, जाधव संकुल ग्रुपचे गौरव जाधव, दिलीप गिरासे, कांतीलाल भंदूरे, सतीश खैरनार, नाना वाघ, अण्णा हजारे, भगवान सोनवणे, आबा महाजन, एकनाथ माळी सर, बंडू गांगुर्डे, लोकेश बाळा गवळी, संजय राऊत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भरत जाधव यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष शिवाजी काळे यांनी मानले. स्वागत श्री प्रकाश महाजन, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर व इंजि. प्रवीण नागरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्ष मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षिरसागर, प्रसिद्धीप्रमुख सागर आनप तसेच कोर कमिटी सदस्य राहुल साळुंके, तुषार भंदूरे, अशोक मंडलिक, गोविंद माळी, गुलाब माळी, दीपक गांगुर्डे, हेमंत शिरसाट, बाळासाहेब भोजने, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, प्रकाश खैरनार, गोकुळ तिडके, हर्षल मोरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
सातपूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच ‘जोती जन्मोत्सव २०२६’ निमित्त आयोजित हा सोहळा समाजप्रबोधन, एकात्मता व प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.



