नाशिक मिरर वृत्तसेवा :
सातपूर विभागात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “गुरु-शिष्य जयंती महोत्सव समिती”च्या वतीने होणाऱ्या ‘जोती जन्मोत्सव २०२६’ या भव्य कार्यक्रमाच्या तयारीला जोर आला असून, या पार्श्वभूमीवर कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शनिवार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजा मैदान, अशोकनगर, सातपूर येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी माकप नेते डॉ. डी. एल. कराड, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका सोनाली भंदुरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक इंजि. प्रवीण नागरे यांनी करत ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा मांडली. यामध्ये सायंकाळी ६ वाजता सामाजिक व्याख्याते अभिजित गायकवाड (नाशिक) यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंजेरी वादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांचे कीर्तन होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत जाधव यांनी ‘जोती जन्मोत्सव’चे महत्त्व अधोरेखित करत समाजजागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष शिवाजी काळे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. समन्वयक प्रकाश महाजन यांनी मागील १९ वर्षापासून असलेल्या समितीचा अहवाल सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले.
या आयोजनात उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्षा मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षिरसागर, प्रसिद्धी प्रमुख सागर आनप यांच्यासह मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, राहुल साळुंखे, गोविंद माळी, तुषार भंदुरे, सुरेश मोरे, अशोक मंडलिक, हेमंत शिरसाट, बाळासाहेब भोजने, दीपक गांगुर्डे, शशिकांत सोनवणे, दयाराम माळी, दिनेश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
उद्घाटन सोहळ्यास जी. एस. सावळे, विजय बुरकुल, नाना वाघ, सतीश खैरनार, दीपक वाकचौरे, गौरव जाधव, जुनेद शेख, संदीप पवार, पत्रकार वसंत आव्हाड, शशिकांत निर्मळ, योगेश घुगे, कमलाकर तिवडे, तुषार ढेपले, सुनील पगारे, संजीवनी जाधव, क्रांती जाधव, रंजना मोरे, सुनिता वाकचौरे, किशोर निकम, ज्ञानेश्वर थोरात, विवेक सोनवणे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
११ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी सातपूर परिसरात उत्सुकता निर्माण झाली असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
