नाशिक मिरर वेबटीम चांदवड : चांदवड तालुक्यातील चांदवड – लासलगाव रोड वरील निमगव्हाण येथे प्रा.श्री. शरद पवार व श्री. दत्ता जाधव यांच्या “इच्छापूर्ती लॉन्स” या मंगलकार्याचा शुभारंभ नवदाम्पत्य च्या हातून संपन्न झाला. श्री. शरद पवार व श्री. दत्ता जाधव हे चांदवड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी आणि उच्चशिक्षित तरुण आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सेवा सुविधांसाठी आपण काहीतरी करावे, असा मानस नेहमी त्यांच्या विचाराधीन असायचा त्याच विचारांची परिपूर्णता करण्यासाठी ह्या दोघांनी मिळून “इच्छापूर्ती लॉन्स” नावाने सुसज्ज व सर्व सेवा सुविधा संपन्न असे मंगल कार्यालय बांधले व याचा शुभारंभ नवदाम्पत्य च्या हातून फित कापून करण्यात आला व विशेष बाब अशी वर पिता आणि वधू पिता याचंही सत्कार लॉन्स च्या वतीने कण्यात आला.


