चांदवड: विटावे विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन पदाधिकारी निवड प्रक्रियेत श्री.रवींद्र दगुजी ठाकरे यांची अध्यक्षपदी, तर सौ. शोभा नामदेव पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सौ. शोभा पवार या सोसायटीच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत.

या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत रवींद्र ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव लक्ष्मण बाबूराव पवार यांनी मांडला, तर त्यास अप्पा शिवराम कोल्हे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी अण्णा पुंजाराम पवार यांनी शोभा पवार यांचे नाव सुचवले आणि त्यास सुभाष कोल्हे यांनी अनुमोदन दिले. ही निवड प्रक्रिया पूर्णतः एकमताने पार पडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

निवडीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर, राष्ट्रवादीचे नेते सुखदेव जाधव आणि खरेदी-विक्री संघाचे स्वीकृत संचालक मनोज बांगरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोसायटीचे संचालक नामदेव पवार, भिमाजी पवार, बाबाजी कारभारी जाधव, बाबाजी सुखदेव जाधव, गोरक्षनाथ पवार, निवृत्ती पवार, मोठ्याभाऊ पवार, दत्तू पवार, रुपेश पवार, पिलू म्हस्के, विकी जाधव, बाळासाहेब जाधव, सोपान पवार, राजू जाधव, सोमनाथ वाघचौरे, प्रदीप ठाकरे, सूरज दरेकर यांच्यासह विटावे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!