चांदवड :  नाशिक मिरर वेबटीम : चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील चार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एकूण ७ लाख ६० हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याबाबत वडनेर भैरव पोलिसांत औरंगाबाद येथील तिघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शेतकरीची झाली फसवणूक : 

किरण माणिक चव्हाण यांचे ३२ रुपये प्रति किलोप्रमाणे ३ लाख ६८ हजार रुपयांचे ११५ क्विंटल द्राक्ष, गणेश विश्वनाथ सलादे यांचे ३० रुपये किलो प्रमाणे १ लाख ६२ हजार रुपयांचे ५५ क्विंटल, राजेंद्र विष्णू चव्हाण यांचे ३० रुपये प्रति किलोप्रमाणे २ लाख १९ हजार रुपयांचे ७३ क्विंटल तर संपत वसंत वक्टे यांचे ३१ रुपये प्रति किलोप्रमाणे १ लाख ७९ हजार रुपयांचे ५८ क्विंटल असे एकूण ७ लाख ६० हजार ८०० रुपयांचे ३०१ क्विंटल द्राक्ष निधोण (ता. फुलांब्री, जि. औरंगाबाद) येथील व्यापारी मोहीनभाई शेख, मोसिनभाई शेख व तौफीकभाई शेख यांना विक्री केले होते. त्यात व्यापाऱ्यांनी शेतकरी किरण चव्हाण यांना १ लाख ६८ हजार रुपये रोख दिले. मात्र उर्वरित रकमेसह इतर शेतकऱ्यांचे पैसे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. याबाबत किरण चव्हाण यांनी वडनेरभैरव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी तिघा व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक एस. डी. वाघ करत आहेत.

बातम्या

Don`t copy text!