
एमएससीबी मनमानी कारभार
सातपूर : नाशिक मिरर वेबटीम लाॅकडाऊनमध्ये व्यवसाय बंद असल्याने वीज वापर न झाल्याने अनेक ग्राहकांच्या बिलावर शून्य युनिट वापर असले तरी, त्यांनाही माेठे बिल देण्यात आले. याबाबत चाैकशी केली असता स्थिर आकार, वीज आकार या नावाखाली बिल दिल्याचे व त्यावर व्याज व १६ टक्के कर वसूल केला जात आहे. कर शासनाकडे जमा हाेत असल्याचे एमएससीबी च्या अधिकारी यांनी सांगितले.कोरोनाच्या संकटाने आर्थिकदृष्ट्या बेजार असलेली सामान्य जनता अनलॉक अंतर्गत हळूहळू आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणत आहे. मात्र, आधीच आर्थिक चणचण त्यात महावितरणकडून मनमानी कारभाराद्वारे युनिट दर वाढवण्यात आला असून, ग्राहकाला मूळ बिल ७ रुपये ३६ पैसे असतांना, त्यांना १११० रुपयांचे बिल देण्यात आले आहे.
नियामक आयाेग नियमानुसारच बिल
सातपूरच्या खाेका मार्केटमध्ये बंद गाळ्याचे मीटर महावितरणने काढून घेतले हाेते. ते सुरू करण्यासाठी संबंधित ग्राहकाने महावितरणने दिलेल्या बिलानुसार ४०८० रुपये बिलाचे व ३५४ रुपये रिकनेक्शनचे असे एकूण ४४३४ रुपयांची रक्कम ५ आॅक्टाेबरला भरली हाेती. ७ आॅक्टाेबरला या ग्राहकाचे वीज मीटर बसवण्यात आले. त्यानंतर १८ आॅक्टाेबर राेजी रिडिंग घेऊन त्यांना एका युनिटचे १११० रुपये आकारले. ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन चाैकशी केली असता त्यांचे काही एक न ऐकता वीज नियामक आयाेगानुसार हे बिल बराेबर असल्याचे सांगत त्यांच्याकडून १११० रुपयांचे बिल घेण्यात आले.
