कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य मिळून सर्वानुमते घोषित 

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम नाशिक मधील कर्तव्य सेवाभावी सामाजिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेची सामाजिक कार्यातील घौडदोड आणि भविष्यात संस्था करणार असलेली सामाजिक कार्ये याविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये सन २०२१ ची कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य मिळून सर्वानुमते घोषित करण्यात आली .अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन जगदीश रायते यांनी दिली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
कार्याध्यक्ष:- हर्षल सुरेश आहेर.
सचिव :- विकास भगवान रायते.
सहसचिव:-श्रेयस प्रदीप माळवे
उपाध्यक्ष :- ईश्वर सयाजीराव घाटोळ व बाळासाहेब रवींद्र पाटील.
खजीनदार:- लोकेश दिलीप कटारिया.
सल्लागार प्रमुख :-मनोज रामदास अहिरे, विकास उत्तम सोनवणे, किरण पगारे,राजाभाऊ भावसार,योगेश वाडेकर.
कायदेशीर सल्लागार:-ऑड बबलू काशीनाथ खरात.
सहखजीनदार :- शरद बाळासाहेब सांगळे.
प्रसिद्धी प्रमुख :- राहुल इस्ते, सुरज कोंडाजी पोटे व मंगेश पोरजे
सदस्य:- दीपक जोशी, निलेश घाटोळ, परमानंद चंदने, ज्ञानेश्वर जमधडे, रोहित शिरोडे,प्रतीक दानेज, नितीन काकूंस्ते, यांची सदस्यपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जीवन रायते यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या काळात आरोग्यविषयक शिबीर, महिला सक्षमीकरण, समाजातील गरीब घटकांची सामाजिक उन्नती ह्या मुख्य विषयांवर संस्था अधिक प्रभावीपणा काम करणार आहे. अशी माहिती संस्थेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष हर्षल आहेर यांनी दिली.

 

बातम्या

Don`t copy text!