नवी दिल्ली: आज संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात महाराष्ट्रातून भाजपच्या काही खासदारांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता खासदार भारती पवार यांचं नावही चर्चेत आलं आहे. भारती पवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि हिना गावित यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता त्यात महाराष्ट्रातून आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. नाशिकच्या खासदार भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
त्यांच्याकडे केंद्रीय राज्य मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्या विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला चार की पाच मंत्रिपदं येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या नेत्यांच्या बदल्यात कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
