सातपूर, अंबड व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील २५० गुन्हेगारांना सुधारण्याची संधी

नाशिक मिरर :

पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित गुन्हेगार सुधार योजनेचे आयोजन शुक्रवारी (दि. ९) सातपूर पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत सातपूर, अंबड व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांना बोलवण्यात येणार आहे.

गुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुन्हेगार सुधार योजनेचे आयोजन केले. यात जून महिन्यात झालेल्या दोन मेळाव्यांत .२५० गुन्हेगारांचे समुपदेशन करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र लिहून घेतले आहे. तसेच सहा जणांवरील प्रस्तावित मोक्का कारवाई टाळली. यामुळे गुन्हेगारांना मूळ प्रवाहात येण्याची एक संधी उपलब्ध होत आहे.

या मेळाव्यात गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे मूळ प्रवाहात येण्यासाठी गुन्हे दाखला असलेल्यांनी जवळील पोलिस ठाण्यात जाऊन नावनोंदणी करून बंधपत्र भरून देण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

बातम्या

Don`t copy text!